
आशिया कप 2025 भारताने जिंकला. मात्र, भारताची हक्काची ट्रॉफी आणि मेडल घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पळाले. एखादा चोर ज्याप्रकारे चोरी करून वस्तू पळून नेतो तशी भारताची ट्रॉफी त्यांनी पळवली. या निर्लज्जपणामुळे बीसीसीआय चांगलीच संतापली आहे. आता हा सामना संपून काही तास उलटली आहेत. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताची ही ट्रॉफी अजूनही परत केली नाही. सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ काही वेळ मैदानात थांबला होता. त्यांनी ट्रॉफीशिवाय विजयाचा जल्लोष देखील केला. मात्र, शेवटपर्यंत भारतीय संघाला मेडल आणि ट्रॉफी देण्यात आली नाही. आता थेट दुबई पोलिसांमध्ये चोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
भारताची ट्रॉफी चोरून नेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या अंगलट येऊ शकते. 72 तास होऊनही त्यांनी ही ट्रॉफी भारताकडे दिली नाहीये. भारताकडेच नाही तर त्यांनी ही ट्रॉफी अजून आशियाई क्रिकेट परिषदेला देखील पाठवली नाही. एसीसी बैठकीत हा वाद उपस्थित करण्यात आला. यादरम्यान अनेक देशांनी मोहसिन नक्वी यांचा निषेध केला. अजूनही भारताची ही ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्याकडेच आहे.
बैठकीत मोहसिन नक्वी यांचा निषेध अनेक देशांनी केल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांनी भारताला ट्रॉफी दिली नाही. आता मोहसिन नक्वी यांच्यावर बीसीसीआय कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असून तसा निर्णय देखील घेण्यात आला. मोहसिन नक्वीविरुद्ध ट्रॉफी चोरी आणि जबरदस्तीने ताब्यात घेतल्याबद्दल दुबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोहसिन हे जेलमध्येही जाऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने मोहसिन नक्वी यांना ट्रॉफी एसीसी कार्यालयात परत करण्यासाठी तब्बल 72 तासांचा वेळ दिला आहे, तोपर्यंत भारताची ट्रॉफी ही मोहसिन नक्वी यांना एसीसी कार्यालयात आणून द्यायची आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर तात्काळ दुबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केला जाईल. जर हा गुन्हा दाखल झाला तर मोहसिन नक्वी यांना अटक देखील होऊ शकते. आता मोहसिन नक्वी काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.