AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahanaryaman Scindia : आजोबांचा, वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध ! MPCA अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यानंतर महानआर्यमन सिंधिया भावूक

Mahanaryaman Scindia : आजोबांचा, वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध ! MPCA अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यानंतर महानआर्यमन सिंधिया भावूक

| Updated on: Sep 04, 2025 | 11:10 AM
Share

महान आर्यमन सिंधिया यांची मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) चे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांचे आजोबा माधवराव आणि वडील ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही हे पद भूषवले होते. आर्यमन यांनी या जबाबदाऱ्या स्वीकारल्या असून, ग्रामीण आणि महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा आणि भारतीय संघात मध्य प्रदेशातील खेळाडूंची संख्या वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. एमपी टी20 लीगची यशस्वीता त्यांनी नोंदवली आहे.

मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन अर्थात एमपीसीएच्या अध्यक्षपदी महानआर्यमन सिंधिया यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी आता ही जबाबदारी स्वीकारली आहे. सिंधिया यांच्या तिसऱ्या पिढीकडे आता एमपीसीएची सूत्र गेली असून यापूर्वी त्यांचे आजोब माधवराव सिंधिया आणि वडील ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही एमपीसीएची सूत्र सांभळली होती. त्यानंतर आता महानआर्यमन हे एमपीसीएच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. 2 सप्टेंबर रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये एमपीसीएच्या अध्यक्षदापची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. अध्यक्षपदी त्यांची निवड बिनविरोध झाली कारण त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज दाखल केला नव्हता. यामुळे त्यांनी आता एमपीसीएचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मानही पटकावला आहे.

एमपीसीएची कमान सांभाळल्यानंतर काय म्हणाले महानआर्यमन सिंधिया ?

एमपीसीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोकळेपणाने संवाद साधला. हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे, असं ते म्हणाले. हे पद म्हणजे केवळ एक महत्वाची जबाबदारी म्हणून मी स्वीकारलेलं नाही तर या भूमिकेमागे एक मजबूत वारसादेखील आहे. याआधी माझ्या आजोबांनी (माधवराव सिंधिया) यांनी हे पद भूषवले होते. खेळाडूंच्या प्रतिभेची ओळख पटवणं आणि ती जोपासणं, ती निखरावी यासाठी प्रोत्साहन देण्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं.एवढंच नव्हे तर माझ्या वडीलांनी (ज्योतिरादित्य सिंधिया) एमपीसीएच्या क्रिकेट प्रशासनात व्यावसायिकता आणि सुव्यवस्थित प्रक्रिया आणली आणि ते आणखी पुढे नेलं. त्यामुळेच त्यांचं हे योगदान पुढे नेणं, मूल्य जोडणं आणि वारसा पुढे नेणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी सज्ज आहे, असं त्यांनी नमूद केलं.

यामध्ये एक जबाबदारी आणि दबाव येत असली तरीही माझ्यासाठी ते अत्यंत रोमांचक देखील आहे. ज्या देशाची जवळपास 70% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्या देशात एका तरुण म्हणून एक नवीन दृष्टीकोन आणि ऊर्जा घेऊन मी येतोय, असं वाटतं, असं महानआर्यमन सिंधिया म्हणाले.

आपल्या जबाबदाऱ्यांबद्दलीही ते यावेळी बोलले. राज्यातील क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण खेळाडू आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन देतील असे ते म्हणाले. भारतीय संघात जास्तीत जास्त खेळाडू(मध्य प्रदेश) राज्यातील असावेत, हे ध्येय आहे. तसेच मध्य प्रदेश टी20 लीग फायदेशीर असल्याचेही ते म्हणाले. राज्यात महिला क्रिकेट मजबूत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

बतौर अध्यक्ष आर्यमन ने अपनी जिम्मेदारियों पर भी बात की. आर्यमन की मानें तो उनका लक्ष्य यह है कि भारतीय टीम में अधिक से अधिक खिलाड़ी प्रदेश के हो. इसके अलावा उन्होंने बताया कि मध्य प्रदेश टी20 लीग फायदे में है. महाआर्यमन प्रदेश में महिला क्रिकेट को और मजबूत करना है. वहीं जब उनसे पूछा गया कि क्या वो बीसीसीआई में जाएंगे, तो उन्होंने कहा कि अभी उनका फोकस एमपी क्रिकेट में है और अगर मौका मिलता है तो इस बारे में जरूर सोचेंगे.

एमपीसीएचे नवे अध्यक्ष महान आर्यमन यांना क्रिकेट प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे. गेल्या तीन वर्षांत क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये त्यांची सक्रियता वाढवताली आहे. 2022 मध्ये त्यांची जीडीसीएचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.तसेच 2022 सालीच त्यांना एमपीसीएचे आजीवन सदस्य बनवण्यात आले. महान आर्यमन हे राज्याची टी20 लीग असलेल्या मध्य प्रदेश लीग (एमपीएल) चेही अध्यक्ष आहेत. स्टेडियममधील सर्व आवश्यक तयारींना अंतिम स्वरूप देणे असेल ही एमपीसीए अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, महाआर्यमन सिंधिया यांची पहिली मोठी जबाबदारी असेल.

Published on: Sep 04, 2025 11:10 AM