विंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅरा मिलिट्री रेजिमेंटमध्ये जाणार

टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. आपण पुढील दोन महिने उपलब्ध नाही, असं 38 वर्षीय धोनीने (M S Dhoni)  बीसीसीआयला (BCCI) कळवलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:16 PM, 20 Jul 2019
विंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅरा मिलिट्री रेजिमेंटमध्ये जाणार

India tour of West Indies मुंबई : टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. आपण पुढील दोन महिने उपलब्ध नाही, असं 38 वर्षीय धोनीने (M S Dhoni)  बीसीसीआयला (BCCI) कळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे धोनी पुढील दोन महिन्यांसाठी पॅरा मिलिट्री रेजिमेंटमध्ये (Para military regiment) सहभागी होणार आहे.

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन वन डे आणि दोन कसोटा सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार आहे.  38 वर्षीय धोनीच्या निवृत्तीचा विषय या बैठकीच्या केंद्रभागी असल्याचे बोलले जात आहे.

धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल काहीही भाष्य केलेले नसले तरी तो निवृत्तीचा विचार करत असल्याची चर्चा आहे. धोनीबाबत होणारा निर्णय भविष्य काळासाठी मोठा संकेत असणार आहे. भारतीय संघ 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने होणार आहेत.

पुढे संधी मिळणार नाही हे धोनीला सांगा; सेहवागचा निवड समितीला सल्ला 

पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वचषकाचा विचार करता निवड समिती धोनीच्या जागी युवा खेळाडू रिषभ पंतचाही विचार करु शकते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतही धोनीला वगळण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही धोनीला वगळले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विश्वचषकात पंतला शिखर धवनच्या दुखापतीनंतर बोलावण्यात आले होते.

धोनीच्या जागी कोण?

धोनीने वेस्ट इंडिजला जाणार नसल्याचं कळवलंय. त्याला दुखापत झाली होती. त्याच्या जागी रिषभ पंत हा पर्याय आहेच, पण संजू सॅमसनलाही संधी मिळू शकते. यापूर्वी सॅमसनची निवड झाली, पण यो यो टेस्टमध्ये तो फेल झाला होता. यावेळी आपण फिटनेसवर मेहनत घेतली असल्याचं त्याने दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

युवा खेळाडूंना संधी

दरम्यान, विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत आणि खलील अहमद यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत.

वेस्ट इंडिज दौरा, पृथ्वी शॉसह या चौघांची निवड निश्चित? 

पॅरा मिलिट्री

प्रादेशिक सेनेने 2011 मध्ये टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंह धोनीला वन डे विश्वचषक विजयानंतर लेफ्टनंट कर्नल ही मानद उपाधी दिली होती. कपिल देवनंतर हा सन्मान मिळवणारा धोनी हा दुसरा क्रिकेटपटू ठरला होता. युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी धोनीला हा गौरव देण्यात आला होता. नोव्हेंबर 2011 मध्ये धोनीला प्रादेशिक सेनेकडू  (TA) लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने सन्मानित करण्यात आलं.

भारत वि वेस्ट इंडिज वेळापत्रक

  • 3 ऑगस्ट – पहिला T20 सामना
  • 4 ऑगस्ट – दुसरा T20 सामना
  • 6 ऑगस्ट – तिसरा T20 सामना
  • 8 ऑगस्ट – पहिला वन डे सामना
  • 11 ऑगस्ट – दुसरा वन डे सामना
  • 14 ऑगस्ट – तिसरा वन डे सामना
  • 22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी
  • 30 ऑगस्ट ते 3सप्टेंबर – दुसरी कसोटी

संबंधित बातम्या   

वेस्ट इंडिज दौरा, पृथ्वी शॉसह या चौघांची निवड निश्चित?

विंडीज दौऱ्यासाठी कोहली उपलब्ध, रोहितकडे कर्णधारपद जाण्याच्या भीतीने निर्णय?

पुढे संधी मिळणार नाही हे धोनीला सांगा; सेहवागचा निवड समितीला सल्ला 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर होणार