वेस्ट इंडिज दौरा, पृथ्वी शॉसह या चौघांची निवड निश्चित?

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. येत्या 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिज दौरा, पृथ्वी शॉसह या चौघांची निवड निश्चित?

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात येणार आहे. येत्या 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीवर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. आता वेस्ट इंडिज दौऱ्यानिमित्त भारतीय संघ नव्या खेळाडूंना आजमावून पाहू शकतो. या नव्या खेळाडूंना 2023 च्या विश्वचषकासाठी तयार केलं जाऊ शकतं. नवे 5 खेळाडू आहेत, ज्यांची विंडीज दौऱ्यासाठी निवड होऊ शकते.

कोण आहेत नवे 5 खेळाडू?

1) पृथ्वी शॉ :

19 वर्षीय पृथ्वी शॉ हा धडाकेबाज सलामीवीर आहे. त्याची तुलना सेहवागशी केली जाते. कोणतीही भीती न बाळगता पृथ्वी शॉ आक्रमक फलंदाजी करतो. पृथ्वी शॉ ने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 26 सामन्यांमध्ये 1065 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 114 पेक्षा जास्त आहे. पृथ्वी शॉने आयपीएमध्येही काही उत्कृष्ट सामने खेळले आहेत. मोठ-मोठ्या गोलंदाजांसमोरही त्याने धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे त्याला संघात घेतलं जाऊ शकतं. शिखर धवन जर या मालिकेतमध्ये खेळला नाही तर त्याच्याजागी पृथ्वी शॉची निवड होऊ शकते.

2) मयांक अग्रवाल :

विश्वचषकात विजय शंकरला दुखापत झाल्याने त्याच्या जागी मयांक अग्रवालला घेण्यात आलं होतं. पण, त्याला एकाही सामन्यात खेळता आलं नाही. यापूर्वी त्याला कसोटी सामन्यांमध्ये पृथ्वी शॉच्या जागी घेण्यात आलं होतं. पृथ्वी शॉला दुखापत झाल्याने मयांक अग्रवालला संधी मिळाली होती. यावेळी मयांकने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने भारतासाठी तीन कसोटी सामन्यांमध्ये 195 धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकं होती. तसेच त्याने प्रथम श्रेणीच्या 75 सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 3605 धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतकं आणि 14 अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मयांकची निवड होण्याची शक्यता आहे.

3) ऋषभ पंत :

ऋषभ पंतला धोनीचा उत्तराधिकारी म्हटलं जातं. पंतला वेस्ट इंडिज दौऱ्यावर यष्टीरक्षणासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकतं. ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

4) श्रेयस अय्यर :

श्रेयस अय्यर हा भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजीच्या समस्येवरील उपाय ठरु शकतो. त्याने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पण, विराट कोहली परत आल्यानंतर त्याला पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आलं. तसं, पाहायला गेलं, तर अय्यरला त्याचा खेळ दाखवण्याची संधीच मिळाली नाही. अय्यर आतापर्यंत फक्त 6 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 293 धावा केल्या. गौतम गंभीरनंतर अय्यर हा दिल्ली आयपीएल संघाचा कर्णधार होता. त्याच्या काळात संघात अनेक चांगले बदल पाहायला मिळाले. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर अय्यरलाही संधी दिली जाऊ शकते.

5) खलील अहमद :

जहिर खान, इरफान पठाण आणि आशिष नेहरा यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला अद्यापही डावखुरा गोलंदाज मिळालेला नाही. पण, खलील अहमद ही जागा भरु शकतो. राजस्थानचा हा वेगवान गोलंदाज 2016 मध्ये अंडर-19 विश्वचषक खेळलेला आहे. तसेच, त्याने 2017 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. गेल्या वर्षी खलीलने आशिया चषकादरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीने त्याने अनेकांना यादरम्यान प्रभावित केलं. खलील अहमद 2019 च्या विश्नचषकातही राहू शकला असता, मात्र मोहम्मद शमीच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे खलीलला ही संधी मिळाली नाही. मात्र, आता वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला ही संधी मिळू शकते.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक

3 ऑगस्ट : पहिला T20 सामना
4 ऑगस्ट : दुसरा T20 सामना
6 ऑगस्ट : तिसरा T20 सामना
8 ऑगस्ट : पहिला वन डे सामना
11 ऑगस्ट : दुसरा वन डे सामना
14 ऑगस्ट : तिसरा वन डे सामना
22 ते 26 ऑगस्ट : पहिली कसोटी
30 ऑगस्ट 3 सप्टेंबर : दुसरी कसोटी

संबंधित बातम्या :

पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नाही : बेन स्टोक्स

इंग्लंडला विश्वविजेता बनवणाऱ्या जोफ्रा आर्चरचा हृदय हेलावणारा खुलासा

धोनीने निवृत्ती घ्यावी ही कुटुंबीयांचीही इच्छा, धोनीच्या प्रशिक्षकांचा दावा

सचिन तेंडुलकरच्या संघात धोनीला स्थान नाही, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *