AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What A Catch ! डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईचा पहिला पराभव, पण चर्चा रंगली ‘त्या’ झेलची Watch Video

डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेत मुंबईचा विजयरथ रोखण्यात अखेर युपी वॉरियर्सला यश आलं. सलग पाच सामन्यात विजय मिळवत मुंबईनं एलिमेंटर फेरीत स्थान निश्चित केलं आहे.

What A Catch ! डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईचा पहिला पराभव, पण चर्चा रंगली 'त्या' झेलची Watch Video
Video: फक्त तीन बोटांमध्ये हरमनप्रीतनं धरला झेल चेंडू, कॅच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: WPL PHOTO
| Updated on: Mar 18, 2023 | 7:43 PM
Share

मुंबई : डब्ल्युपीएल 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. गुणतालिकेत मुंबईचा संघ पाच विजयांसह टॉपवर आहे. तर आरसीबी संघ एका विजयासह तळाशी आहे. डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईला युपी वॉरियर्सनं पहिल्यांदाच पराभवाची धूळ चारली आहे. मुंबई या स्पर्धेतील पहिलाच सामना गमावला आहे. युपीने 5 गडी आणि 3 चेंडू राखून मुंबईचा पराभव केला. या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी हरमनप्रीतनं घेतलेल्या झेलची चर्चा रंगली आहे.

युपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरची बॅटिंग हवी तशी झाली नाही. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वबाद 127 धावा केल्या आणि विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं. युपीने हे आव्हान 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं.

युपीला विजयासाठी दिलेलं आव्हान कमी असल्याने मुंबईनं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर जोर दिला. मुंबईने पहिल्या षटकात एक धाव देत युपीवर दबाब निर्माण केला. दुसरं षटक टाकण्यासाठी स्पिनर हेली मॅथ्युज आली आली पहिल्याच चेंडूवर देविका वैद्यला काही कळलंच नाही कट लागली.

स्लिपला उभ्या असलेल्या हरमनप्रीतनं क्षणाचाही विलंब न करता उडी मारली आणि उजव्या हाताच्या तीन बोटात झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर हरमनप्रीतही आवाक् झाली. तिने तीन बोटात पकडलेला झेल सर्वांना दाखवला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईची बॅटिंग

यूपीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन एलिसा हिली हीचा निर्णय यूपीच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. मुंबईकडून हॅली मॅथ्यूज हीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. इस्सी वाँग 32 रन्सवर रनआऊट झाली. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 25 धावांची खेळी. या व्यतिरिक्त यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठू दिला नाही. मुंबईने  20 ओव्हरमध्ये सर्वबाद 127 धावा करता आल्या. तर यूपीकडून सोफी एक्लेस्टोन हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या दोघींनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अजंली सर्वनी हीने 1 विकेट घेतली.

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (wk), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, इस्सी वाँग, हुमैरा काझी, धारा गुजर, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता आणि सायका इशाक

यूपी वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन | एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), देविका वैद्य, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, पार्शवी चोप्रा, अंजली सरवाणी आणि राजेश्वरी गायकवाड.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.