AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : मनगटावरुन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांवर अखेर सूर्यकुमार यादवने सोडलं मौन, सरळ बोलला की..

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने खराब फॉर्म सुरु असला तरी मेहनत आणि प्रक्रियेवर जास्त विश्वास दाखवला. वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत मी चांगलं प्रदर्शन करुन प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळवला होता, याची आठवण त्याने करुन दिली.

Suryakumar Yadav : मनगटावरुन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांवर अखेर सूर्यकुमार यादवने सोडलं मौन, सरळ बोलला की..
Suryakumar Yadav Image Credit source: PTI
| Updated on: May 25, 2026 | 1:24 PM
Share

इंडियन प्रीमियर लीग IPL 2026 मध्ये शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच आली. संपूर्ण सीजन फ्लॉप असलेल्या सूर्यकुमार यादवने शेवटच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करताना त्याची बॅट चांगलीच तळपली. सूर्यकुमार यादवने 3 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 64 धावा केल्या. पण तो मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात 30 धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा चालू आयपीएल सीजनमधीला हा शेवटचा सामना होता.

संपूर्ण सीजन सूर्यकुमार यादव आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. सोशल मिडिया आणि क्रिकेट जगतात सूर्यकुमार यादवचा फिटनेस, खासकरुन मनगटाच्या दुखापतीवरुन अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. सूर्यकुमार यादवने या सर्व चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. जे लोक माझ्या मनगटाच्या दुखापतीबद्दल बोलत आहेत, कदाचित त्यांना क्रिकेटची इतकी समज नाहीय. मुंबई इंडियन्सचा हा स्टार फलंदाज बोलला की, खरच माझ्या मनगटाला दुखापत झाली असती, तर मी माझा ट्रेडमार्क फ्लिक शॉट्स कधीच खेळू शकलो नसतो.

खूपच खराब प्रदर्शन

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने खूपच खराब प्रदर्शन केलं. टीम प्लेऑफमध्य स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. सूर्यकुमारला यादवला संपूर्ण सीजनमध्ये सूर सापडला नाही. या दरम्यान सोशल मिडिया आणि क्रिकेट विश्वात सूर्यकुमारचा फिटनेस खासकरुन मनगटाच्या दुखापतीबद्दल बरचं काही बोललं जातं होतं.

ते कोणी मोठे फिजियो आहेत

सूर्यकुमार यादव ब्रॉडकास्टर्सशी बोलताना म्हणाला की, “सर्वप्रथम मी मनगटाच्या दुखापतीबद्दल काही गोष्टी स्पष्ट करेन. जे कोणी असं बोलतायत एकतर ते कोणी मोठे फिजियो आहेत किंवा त्यांना क्रिकेटची समज नाही. माझ्या मनगटाला खरच दुखापत झाली असती, तर मी फ्लिक शॉट्स खेळू शकलो नसतो. माझे अनेक शॉट्स हे मनगट आणि हँड-आय कोऑर्डिनेशवर अवलंबून असतात” “मी अफवांवर जास्त लक्ष देत नाही. काही गोष्टी खेळाडूंच्या कंट्रोलमध्ये नसतात हे सुद्धा सूर्यकुमारने स्पष्ट केलं. या अशा गोष्टी आहेत, ज्या माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत, त्यामुळे मी त्यावर लक्ष देत नाही” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

Follow Us
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल