Rohit Sharma : ज्या दिवशी रोहितचे फिफ्टी, त्या दिवशी ती टीम स्पर्धेबाहेर, IPL 2025 मध्ये चार टीम्ससोबत असं झालय, एकदा वाचा
Rohit Sharma : हे सर्व झालय रोहितच्या एका शस्त्रामुळे. ज्यामुळे या सीजनमध्ये रोहितने चार टीम्सना निरोप दिला. आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सच टीम रडारवर आहे. रोहितकडे असलेलं ते शस्त्र काय आहे?.

IPL 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 रन्सनी हरवून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. या महत्त्वाच्या विजयात रोहित शर्माने महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने संपूर्ण सामन्यात 50 चेंडूत 162 च्या स्ट्राइक रेटने 81 धावा ठोकल्या. त्याच्या अर्धशतकी इनिंगमुळे मुंबईची टीम 229 धावांच डोंगराएवढ लक्ष्य उभी करण्यात यशस्वी ठरली. अखेरीस गुजरातला हरवून त्यांना स्पर्धेबाहेर केलं. ही पहिली वेळ नाहीय, रोहित कुठल्या टीमसाठी बाहेर जाण्याचं कारण ठरलाय. हे सर्व झालय रोहितच्या एका शस्त्रामुळे. ज्यामुळे या सीजनमध्ये रोहितने चार टीम्सना निरोप दिला. आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सच टीम रडारवर आहे. रोहितकडे असलेलं ते शस्त्र काय आहे?.
30 मे रोजी झालेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये रोहितने जॉनी बेयरस्टोसोबत मिळून पहिली बॅटिंग करताना टीमला स्फोटक सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 7.2 ओव्हर्समध्ये 84 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 59 रन आणि तिलक वर्मासोबत 43 धावा जोडल्या. या दरम्यान रोहितने स्वत: अर्धशतक झळकावलं. याच हाफ सेंच्युरीच्या शस्त्रामुळे रोहितने आतापर्यंत चार टीम्सना स्पर्धेबाहेर ढकललय. या सीजनमध्ये रोहितने ज्या दिवशी फिफ्टी मारली, त्या दिवशी ती टीम टुर्नामेंट बाहेर गेलीय. रोहितने या सीजनमध्ये आपलं पहिलं अर्धशतक 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झळकावलं.
त्या चार टीम्स कुठल्या?
त्याने 45 चेंडूत फटकावलेल्या 76 धावा सीएसकेच्या पराभवाच कारण ठरल्या. हा सामना हरल्यानंतर सीएसकेची टीम टूर्नामेंट बाहर गेली. त्यानंतर 23 एप्रिलला त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 46 चेंडूत 70 रन्स केल्या. हैदराबादसाठी हा सामना करो या मरो सामना होता. पण मुंबईने सोपा विजय मिळवला. SRH ची टीम बाहेर गेली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सची टीम रोहितची शिकार ठरली. 1 मे रोजी रोहितने राजस्थान विरुद्ध 36 चेंडूत 53 धावा फटकावल्या. राजस्थानसाठी टूर्नामेंटमध्ये टिकून राहण्याची शेवटची संधी होती. पण पराभूत होऊन ते बाहेर गेले. आता प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्सच हेच झालं.
या सीजनमध्ये रोहितच्या किती धावा झाल्यात?
आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्माने शानदार प्रदर्शन केलय. तो टीमचा दूसरा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्याने 14 सामन्यात 31.53 च्या सरासरीने 150 च्या स्ट्राइक रेटने 410 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने चार हाफ सेंच्युरी झळकवल्या. ते सर्व सामने मुंबईने जिंकले. .
