AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुसरं पदक मिळवल्यानंतर मनु भाकरने मन केलं मोकळं, म्हणाली की..

पॅरिस ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी भारताला आनंदाची बातमी मिळाली. स्पर्धेतील दुसरं पदक मनु भाकरने मिळवून दिलं. या स्पर्धेत सलग दोन पदकं मिळवणारी भाकर ही भारताची पहिली स्पर्धक ठरली आहे. पदक मिळवल्यानंतर नेमबाज भाकरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुसरं पदक मिळवल्यानंतर मनु भाकरने मन केलं मोकळं, म्हणाली की..
| Updated on: Jul 30, 2024 | 2:29 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनु भाकरने इतिहास रचला आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अशी कामगिरी यापूर्वी कोणत्याही भारतीयाच्या नावावर नाही. मनु भाकरने वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्टल फेरीत पहिलं कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर आता 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड प्रकरात दुसरं कांस्य पदक मिळवलं आहे. यासह मनु भाकरने काही विक्रमांची नोंद केली आहे. भारताकडून पहिली महिला नेमबाज असून तिने पदक मिळवलं आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी पहिली आणि एकमात्र भारतीय खेळाडू ठरली आहे. पदक मिळवल्यानंतर मनु भाकरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘मला हे पदक जिंकल्याचा अभिमान आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. हा फक्त आशीर्वाद आहे. सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. जे काही आमच्या हातात आहे ते आम्ही फक्त नियंत्रित करू शकतो. मी येथे येण्यापूर्वी वडिलांशी याबाबत बोलली होती आणि ठरवलं होतं की शेवटच्या शॉटपर्यंत लढा द्यायचा.’

दुसरीकडे, मिक्स्ड डबलमध्ये मनु भाकरचा 22 वर्षीय साथीदार सरबजोत सिंहने पहिलं मेडल जिंकल्यावर आनंद व्यक्त केला आहे. त्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, ‘खूप छान वाटत आहे.सामना कठीण होता. आनंद आहे की आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. खूप दबाव होता. पण प्रेक्षकवर्ग चांगला होता.’ या सामन्यात सरबजोत सिंहने निराशा केली. पण मनु भाकरने जराही डगमगळी नाही आणि फॉर्म कायम ठेवला. या दोघांनी मिळून कोरियन जोडीला पराभूत केलं. भारताने कांस्य पदक जिंकताच टाळ्यांच्या कडकडाटासह जल्लोष करण्यात आला.

पहिल्या सेटमध्ये कोरियाचं वर्चस्व दिसून आलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांच्या पोटात गोळा आला होता. पण त्यानंतर या जोडीने कमबॅक केलं आणि सलग पाच सेट नावावर केले. दरम्यान, मनुने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवली आहे. यासह ती दोन पदकं मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पंगतीत बसली. सुशील कुमार आणि पीव्ही सिंधु यांनी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवली आहेत. सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रजत पदक मिळवलं होतं. तर पीव्ही सिंधुने रियो ऑलिम्पिकमध्ये रजत आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.