Asian Games Kabaddi | एशियन गेम्समध्ये टीम इंडिया पुन्हा कबड्डी बादशाह, इराणवर मात करत गोल्डन कामगिरी

Asian Game Kabaddi india win gold : एशियन गेममध्ये महिला कबड्डी संघानंतर पुरूष कबड्डी संघानेही सुवर्णपदक पटकावलं आहे. इराण आणि भारतामध्ये झालेल्या फायनलमध्ये विजय मिळव 2018 साली झालेल्या पराभवाचा बदला घतला आहे.

Asian Games Kabaddi | एशियन गेम्समध्ये टीम इंडिया पुन्हा कबड्डी बादशाह, इराणवर मात करत गोल्डन कामगिरी
Kabaddi Asian Game Win Gold
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 4:32 PM

मुंबई : एशियन गेम्स 2023मध्ये भारतीय पुरूष कबड्डी संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. फायनल सामन्यामध्ये इराणच्या संघाला धूळ चारत भारताने सुवर्ण कामगिरी केली आहे. महिला कबड्डी संघाने तैवान संघाला हरवत सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर आता पुरूष संघानेही चमकदार कामगिरी केलीये. सामन्यामध्ये मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता, मात्र अखेर भारताने इराणचा 33-29 ने विजय मिळवला आहे. भारताचे जिंकलेल्या गोल्ड मेडलसह आतापर्यंत एकूण 103 पदक झाली आहेत. भारताने 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदके नावावर केली आहेत. कबड्डी आणि क्रिकेटमध्ये भारताने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.

पाहा व्हिडीओ –

 असा रंगला फायनल सामन्याचा थरार-

भारताची सुरूवात खराब झाली होती कारण इराण संघाने सुरूवातील 3-1 ने अशी आघाडी मिळवली होती. काही सेकंदात 5-5 अशी बरोबरी साधली होती. परत इराणवर भारतावर दबाव टाकत आघाडी घेतली होती. परत एकदा भारतीय खेळाडूंनी कमबॅक कर 17-13 ने आघाडी घेतली. हाल्फ टाईममध्ये भारताचा संघ पूढे होता.

इराणनेही आक्रमण करत भारताला ऑल आऊट करत 25-25 अशी बरोबरी केली होती. परत दोन्ही खेळाडूंंनी 28-28 अशी बरोबरी साधली होती. त्यावेळी एका पॉइंटवरून बराच राडा झालेला पाहायला मिळाला. जवळपास ३० मिनिटो म्हणजे अर्धातास खेळ थांबवण्यात आला होता. अवघी २ मिनिटे सामना संपायला बाकी होतीत अखेर पंचांनी निर्णय घेत भारताला ३ आणि इराणला १ गुण देत सामना सुरू केला. भारतीय खेळाडूंनी कोर्टवरच बसत निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पंचांनी निर्णय भारतीय संघाच्या पारड्यात दिला.

दरम्यान, एशियन गेममध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताने कबड्डीमधून एकूण 13 पदके जिंकून दिली आहेत. यामध्ये 11 सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे. यामधील पुरूष संघाने 9 तर महिला संघाने 4 पदके जिंकली आहेत. महिला संघाने 3 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक देशाला मिळवून दिलं आहे.

Non Stop LIVE Update
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.