AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Athletics Championship : आजीची कमाल, जागतिक स्पर्धेत धमाल, वयाच्या 94व्या वर्षी मिळवलं सुवर्णपदक

भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केलं. तुम्ही म्हणाल वयाच्या शंभराला टेकलेल्या आजींनी ही किमया कशी पार केली. तर यापुढे ऐका, या आजी इथंच थांबत नाही. त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. यातही त्यांनी कांस्यपदक पटकावलंय.

World Athletics Championship : आजीची कमाल, जागतिक स्पर्धेत धमाल, वयाच्या 94व्या वर्षी मिळवलं सुवर्णपदक
94 वर्षांच्या भगवानी देवी डागरImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 12, 2022 | 7:19 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल पन्नाशी ओलांडली की लोकांना काम नकोस वाटतं. अहो पन्नाशी पण ठिक आहे. अलिकडे पस्तीशीतल्या लोकांना थोडे कष्ट पुरले की किती आराम करू आणि किती नको, असं होतं. पण, याउलट वद्धांमधील काहीतरी क्रिएटीव्ह करण्याची इच्छाशक्ती अधिक असल्याचं दिसून येतंय. कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. असंच एक उदाहरण समोर आलंय. 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) यांनी तरुणाईला लाजवेल असं काम केलंय. त्यांनी या वयात फिनलंडमध्ये (Finland) सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धेमध्ये (World Athletics Championship) 100 मीटर स्प्रिंट म्हणजेच वेगात चालण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावलंय. या आजीबाईंच्या या अनोख्या कामगिरीमुळे तरुणाई देखील अवाक झाली आहे.

वृत्तसंस्थेचं ट्विट

भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केलं. तुम्ही म्हणाल वयाच्या शंभराला टेकलेल्या आजींनी ही किमया कशी पार केली. तर यापुढे ऐका, या आजी इथंच थांबत नाही. त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. यातही त्यांनी कांस्यपदक पटकावलंय. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचं खूप कौतुक होतंय. या आजींच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला सोशल मीडियावर लोकांनी सलाम केला आहे.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचं कौतुक केलंय. मंत्रालयानं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘भारतातील 94 वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.’

क्रीडा मंत्रालयाचं ट्विट

भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअ‍ॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचं दाखवून दिलंय. विशेष म्हणजे चेन्नईमध्ये झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला.

Follow Us
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!