बबिता फोगाट यांच्या घरी छोट्या परीचं आगमन, पहिला फोटो शेअर करत म्हणाल्या…

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि भाजपा नेत्या बबिता फोगट यांच्या घरी लहान परीचं आगमन झालं आहे. दंगल गर्ल म्हणून ख्याती असलेल्या बबिता फोगाट यांनी ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बबिता फोगाट यांच्या घरी छोट्या परीचं आगमन, पहिला फोटो शेअर करत म्हणाल्या...
बबिता फोगाट यांच्या घरी छोट्या परीचं आगमन, पहिला फोटो शेअर करत म्हणाल्या...
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 11, 2026 | 10:19 PM

कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. बबिता फोगाट दुसऱ्यांदा आई झाली असून एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दिल्लीतील शालीमार बाग येथील एका रुग्णालयात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बबिताने एका मुलीला जन्म दिला. बबिता फोगाट यांनी घरी जानेवारी 2021 मध्ये मुलाला जन्म दिला होता. आता परीचं घरी आगमन झाल्यानंतर तिने हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. फोटो शेअर करताना चिमुकलीचा चेहरा दाखवला नाही, पण छान इमोजी लावून तिने आपल्या भावना चाहत्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. चिमुकल्या परीला पार्वती स्वरूप संबोधून महादेवांची कृपा झाल्याची भावना यावेळी बबिता फोगाट यांनी व्यक्त केली.

बबिता फोगाट यांनी सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

बबिता फोगाट यांनी सोशल मीडियावर मुलीसोबत फोटो शेअर केला. तसेच माहिती देत सांगितलं की, “महादेवाची कृपा पाहा, आज शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, पार्वती स्वरूप एक चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आहे. मला मुलीच्या रूपात मिळालेला आनंद हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक अनमोल आशीर्वाद आहे. ही भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे.”

कुस्तीपटू बबिता फोगाट आणि विवेक सुहाग यांनी 1 डिसेंबर 2019 रोजी लग्न केलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना मुलगा झाला. पाच वर्षानंतर त्यांच्या घरी लहानग्या परीचं आगमन झालं आहे. बबिता आता आपल्या कुटुंबासोबत सोनीपतमधील कुमासपूरजवळ असलेल्या एल्डेको काउंटीमध्ये राहतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक

बबिता फोगाटने वयाच्या 17 व्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. 2006 साली झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकून बबिताने विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर 2010 च्या दिल्लीत आयोजित केलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही रौप्य पदक पटकावलं होतं. तसेच 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ स्परदेत 55 किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता. कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर बबिता फोगाट हिने वडील महावीर सिंग यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us