Meet our little SONshine, दंगल गर्ल बबिता फोगटला पुत्ररत्नाचा लाभ

भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगटला नुकतंच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. (Babita Phogat Gives Birth To Baby Boy)

Meet our little SONshine, दंगल गर्ल बबिता फोगटला पुत्ररत्नाचा लाभ

मुंबई : भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगटला आज (11 जानेवारी) पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. बबिताने पती विवेक सुहाग याच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. (Babita Phogat Gives Birth To Baby Boy)

“आमच्या मुलाला भेटा, स्वप्नांवर विश्वास ठेवा, ते पूर्ण होतात. आमचं पूर्ण झालंय, निळ्या कपड्यांमध्ये पाहा,” अशी पोस्ट बबीता फोगटने शेअर केली आहे. बबीता फोगटने तिच्या मुलाचा फोटोही शेअर केला आहे.

बबीता फोगाट आणि विवेक सुहाग हे दोघेही कुस्तीपटू आहे. काही वर्षांपूर्वी त्या दोघांनी नच बलिये या डान्स शोमध्ये भाग घेतला होता. बबिता आणि विवेकने हे दोघे पाच वर्षापासून रिलेशनमध्ये होते. ते दोघे 2 डिसेंबर 2019 रोजी विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2020 मध्ये इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आई होणार असल्याची बातमी दिली होती.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर 

बबीता फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकाची कमाई केली होती. तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. तिच्या या कामगिरीनंतर हरियाणा सरकारने तिला उपनिरीक्षकाची नोकरी दिली होती. मात्र त्यानंतर तिनेही नोकरी सोडली.

बबीता फोगट राजकारणात सक्रीय आहे. 2019 च्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र तिचा पराभव झाला. सध्या ती हरियाणा महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आहे.

विराट-अनुष्काची गुडन्यूज

“आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे” असे ट्विट विराट कोहलीने केले आहे. (Babita Phogat Gives Birth To Baby Boy)

संबंधित बातम्या : 

PHOTO | दंगल गर्ल बबिता फोगट आई होणार, इन्स्टाग्रामवर दिली गुड न्यूज

Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI