AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाख

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ खेळत आहे. मागच्या वर्ल्डकपच्या तुलनेत यंदा 16 संघ वाढले आहे. त्यापैकी काही संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहेत. यात एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाख आहे आणि स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाख
FIFA World Cup 2026 स्पर्धेत हे देश पहिल्यांदाच खेळणार, एका देशाची लोकसंख्या फक्त 1.50 लाखImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 04, 2026 | 5:13 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेची उत्सुकता ताणली गेली आहे. यंदा स्पर्धेचं 23वं पर्व असून 48 संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात असून 16 शहरांमध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. यंदा 48 संघ भाग घेत असले तरी त्यात फक्त 4 देश पहिल्यांदा फिफा वर्ल्डकप खेळणार आहेत. म्हणजेच 44 संघ या स्पर्धेत कधी ना कधी खेळले आहेत. पदार्पण करणाऱ्या चार संघांपैकी एका संघाच्या देशाची लोकसंख्या फक्त दीड लाख आहे. कॅरेबियन आयर्लंड असलेल्या क्यूराकाओ या देशाने वर्ल्डकप स्पर्धेत जागा मिळवली आहे. या देशाची लोकसंख्या 1,58,000 आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणारा क्यूराकाओ हा सर्वात छोटा देश ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम आइसलँडच्या नावावर होता.

क्यूराकाओ हा देश फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ई गटात आहे. या गटात जर्मनी, आयवरी कोस्ट आणि इक्वाडोर हे संघ आहेत. क्युराकाओ या देशाने CONCACAF पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आणि वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं. पात्रता फेरीत बार्बाडोसला 4-1, अरुबाला 2-0, सेंट लुसियाला 4-0 आणि हैतीला 5-1 ने पराभूत केलं. या पात्रता सर्वच्या सर्व सामने जिंकून आपलं स्थान पक्क केलं. कुराकाओ देशाव्यतिरिक्त जॉर्डन, उझबेकिस्तान आणि केप वर्दे या तीन देशांनी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा स्थान मिळवलं आहे.

एएफसी पात्रता फेरीत दक्षिण कोरियानंतर दुसऱ्या स्थानावर राहून जॉर्डनने स्थान पक्कं केलं. उझबेकिस्तानने उत्तर अमेरिकेत झालेल्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून आपले स्थान निश्चित केले. तर केप वर्देने गेल्या ऑक्टोबरमध्ये 2026 मध्ये स्थान पक्कं केलं आणि स्पर्धेत सहभागी होणारा दुसरा सर्वात लहान देश असेल. जॉर्डन हा देश जे गटात असून या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि अल्जेरिया हे देश आहेत. अझबेकिस्तान के गटात असून या गटात पोर्तुगाल, कोलंबिया आणि डीआर काँगो हे देश आहेत. केप वर्दे हा एच गटात असून या गटात स्पेन, उरुग्वे आणि सौदी अरेबिया या संघाचा समावेश आहे.

Follow Us
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...