Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: ब्राझीलचा 88 वर्षे जुना विक्रम अबाधित, यंदाही तशीच सुरूवात

FIFA World Cup 2026, Group C Match Result: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ब्राझीलचा पहिला सामना मोरोक्कोविरुद्ध पार पडला. हा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. या ड्रॉसह ब्राझीलने 88 वर्षांपासून फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सुरू असलेला विक्रम यंदाही कायम ठेवला आहे.

Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: ब्राझीलचा 88 वर्षे जुना विक्रम अबाधित, यंदाही तशीच सुरूवात
Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: ब्राझीलचा 88 वर्षे जुना विक्रम अबाधित, यंदाही तशीच सुरूवात
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 14, 2026 | 6:19 PM

Brazil vs Morocco Match Result: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या ग्रुप सी मध्ये ब्राझीलने आपला पहिला सामना मोरक्कोविरुद्ध खेळला. हा सामना न्यू जर्सीच्या ईस्ट रूदरफोर्डच्या न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियममध्ये खेळला गेला. ब्राझील आणि मोरक्को यांच्यातील हा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. सामना ड्रॉ झाला असला तरी ब्राझील संघाच्या नावावर सुरू असलेला 88 वर्षे जुना विक्रम अबाधित राहिला आहे. ब्राझीलने गेल्या 88 वर्षात फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिला सामना गमावलेला नाही. ब्राझीलला फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यात शेवटचा पराभव 1934 साली झाला होता. तेव्हा स्पेनने 3-1 ने ब्राझीलला मात दिली होती. पण 1938 पासून 2026 पर्यंत म्हणजेच 88 वर्षात ब्राझीलने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आपला पहिला सामना गमावलेला नाही.

ब्राझील मोरक्को सामन्यात काय घडलं?

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ब्राझीलचा संघ नेमारशिवाय मैदानात उतरला होता. नेमार दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्याला मुकला. असं असताना मोरक्कोने ब्राझीलविरुद्ध आक्रमक सुरूवात केली. त्याचा फायदा त्यांना मिळाला. या सामन्याच्या 21व्या मिनिटाला इस्माइल सायबेरीने गोल मारला आणि 1-0 ने आघाडी घेतली. मोरक्कोच्या आघाडीनंतर ब्राझीलनेही आपल्या खेळात बदल केला. त्यांनी आक्रमक पण चढाई करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या सामन्याच्या 32व्या मिनिटाला गोल बरोबरी साधण्यात यश आलं. ब्राझीलसाठी विनसियस ज्यूनिअरने गोल मारून 1-1 अशी बरोबरी केली. दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी दुसऱ्या डावात धडपड केली पण त्यांना यश आलं नाही. हा सामना अखेर ड्रॉ झाला. या सामन्याचा आनंद फिफा अध्यक्षांनीही लुटला.

88 वर्षात ब्राझीलने पहिला सामना गमावलेला नाही

ब्राझीलने मोरक्कोविरुद्धचा सामना ड्रॉ करून 88 वर्षांपासून सुरू असलेला इतिहास कायम ठेवला आहे. 88 वर्षात ब्राझीलने 21 सलामीचे सामने खेळते त्यात 17 सामन्यात विजय आणि 4 सामने ड्रॉ झाले आहेत. यात ब्राझीलने 48 गोल मारले आणि प्रतिस्पर्धी संघाकडून 18 गोल पडले. ब्राझीलने 1938 मध्ये पोलँडला 6-5 ने पराभूत केलं होतं. त्यानंतर 1950 मध्ये मॅक्सिकोला 4-0, 1958 मध्ये ऑस्ट्रियाला 3-0, 1962 मध्ये मॅक्सिकोला 2-0, 1966 मध्ये बुल्गारियाला 2-0 ने पराभूत केलं होतं.

1970 मध्ये युगोस्लाविया -0-0 ड्रॉ, तर दुसऱ्या सामन्यात चेकोस्लावाकियाला 4-1 ने मात दिली. 1982 मध्ये सोवियत यूनियलान 2-1, 186 मध्ये स्पेनला 1-0, 1990 मध्ये स्वीडनला 2-1 ने, 1994 मध्ये रशियाला 2-0 ने, 1998 मध्ये स्कॉटलँडला 2-1 ने, 2001 मध्ये तुर्कीला 2-1 ने. 2006 मध्ये क्रोएशियाला 1-0 ने, 2010 मध्ये उत्तर कोरियाला 2-1 ने, 2014 मध्ये क्रोएशियाला 3-1 ने नमवलं. 2018 मध्ये स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना 1-1 ड्रॉ झाला. 2022 मध्ये सर्बियाला 2-0 ने पराभूत केलं आणि आता मोरोक्कोविरुद्धचा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला.

Follow Us