रिफॉर्म एक्सप्रेस थांबणार नाही, फ्रान्समध्ये PM मोदी यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील नीस येथे 'इंडिया इनोव्हेट्स २०२६' कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ते यावेळी म्हणाले की, भारत एआय (AI) आणि इनोव्हेशन क्षेत्रात एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. भारत नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी कार्यरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी नीस शहरात फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन ( Emmanuel Macron ) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी भारत इनोव्हेट्स – २०२६ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या सोहळ्यात भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी भारताने गेल्या १२ वर्षात एक मजबूत इनोव्हेशन सिस्टीम तयार केली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टीम बनला आहे. ते यावेळी म्हणाले की येत्या काळात या स्टार्टअप्सची संख्या आणखीन वाढेल…
पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताची सर्वात मोठी ताकद इनोव्हेशन आहे. नाविण्यता वा इनोव्हेशन भारताच्या डीएनएमध्ये आहे. आमची प्राथमिकता अशा तंत्राला विकसित करणे जे मानवतेच्या कामी येईल आणि लोकांचे जीवन चांगले बनवेल. ते म्हणाले की भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या क्षेत्रात मोठी संधी आहे. आणि देश नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांचे जीवन बदलण्याचे काम करत आहे.
भारत स्टार्टअप क्रांतीच्या दिशेने – पीएम मोदी
कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की २१ व्या शतकात भारत वेगाने बदलत आहे. देश आता माहिती क्रांतीच्या बळावर स्टार्टअप क्रांतीच्या दिशेने वाढत आहे. ते म्हणाले की भारताचे युवक नवे विचार आणि नव्या ध्यासाने मोठ्या समस्यांवर उत्तर शोधत आहेत. त्यांनी शोधलेली उत्तरे केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जग आणि मानवतेच्या कल्याणासाठी उपयोगी सिद्ध होत आहेत.
रिफॉर्म एक्सप्रेस थांबणार : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की भारत वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन करत आहे. भारत टीकाऊ भविष्यासाठी नवीन शोध लावत आहे आणि जगाच्या गरजांना ध्यानात घेऊन तंत्रज्ञान विकसित करत आहे. त्यांनी आपल्या सुधारणा कार्यक्रमाचा उल्लेख करत म्हटले की आता रिफॉर्म एक्सप्रेस थांबणारी नाही. सुधारणांचा हा सिलसिला पुढेही सुरु राहणार आहे. आणि या स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनना आणखी ताकद मिळेल.
पंतप्रधान पुढे म्हणाले की भारत आणि फ्रान्सचे नाते केवळ व्यापार वा धोरणात्मक सहकार्य नाही. तर सर्वसमावेशक मूल्ये आणि सामायिक विचार यावर आधारित आहे. ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये नातेसंबंध देखील आहेत, विश्वास देखील आहे, इनोव्हेशन देखील आहे आणि प्रेरणा देखील आहे. समान जोडणीचा आधारावर भारत आणि फ्रान्सचे नवे तंत्रज्ञाने, शिक्षण, शोध आणि भविष्याच्या क्षेत्रात एकत्र मिळून पुढे जात आहेत.
तीन दिवस भारत इनोव्हेट्स 2026
भारत, फ्रान्स आणि जगभरातील इतर देशांमधील स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंडांना एकत्र आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम १४ जून ते १६ जून दरम्यान चालणार आहे. भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षामधील हा एक प्रमुख कार्यक्रम मानला जातो. नवीन तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि व्यावसायिक भागीदारी यांना प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे.
