AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेचं जेतेपद भारताकडे, अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला 4-1ने नमवलं

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना भारताने जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने पहिल्या दोन सत्रात आघाडी घेत दक्षिण कोरियाला पिछाडीवर ढकललं होतं.

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेचं जेतेपद भारताकडे, अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला 4-1ने नमवलं
आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेचं जेतेपद भारताकडे, अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला नमवलंImage Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Sep 07, 2025 | 9:23 PM
Share

आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने आशिया कप स्पर्धेचं जेतेपद चौथ्यांदा कोरलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. सुपर 4 फेरीतील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. मात्र अंतिम फेरीत भारताने दक्षिण कोरियाला पुन्हा संधी दिली नाही. पहिल्या मिनिटापासून भारतीय संघाने आघाडी घेतली. सुखजीत सिंगने 30 व्या सेकंदाला पहिला गोल केला. त्यामुळे दक्षिण कोरिया संघाची बरोबरीची धडपड सुरु झाली. मात्र त्यांना पहिल्या सत्रात तर बरोबरी काही साधता आली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारत आघाडी घेत राहिला. तर चौथ्या सत्रात एक गोल करण्यात कोरियाला यश आलं. पण तिथपर्यंत बराच वेळ झाला होता.

दुसऱ्या सत्रात भारताने आणखी एका गोलची आघाडी घेतली. दिलप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला हा गोल साधण्यात यश आलं. यामुळे टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली. संजयने लाँग बॉल घेत तो दिलप्रीतकडे पास केला. दिलप्रीतने या संधीचं सोनं केलं आणि गोलकीपरच्या पायांमधून गोलपोस्टच्या आत चेंडू मारला. यासह भारताने 2-0 अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या सत्रातसंजयला ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर भारताला खेळाडूंसह उतरावं लागलं. पण ही परिस्थिती फक्त एक मिनिट होती. तिसऱ्या सत्राच्या शेवटच्या मिनिटाला दिलप्रीतने तिसरा गोल मारला. यासह भारताने 3-0 ने आघाडी घेतली. भारताच्या विजयाच्या आशा आणखी बळकट केल्या.

चौथ्या सत्रात अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवरून भारतासाठी हा गोल केला. यासह 4-0 ची आघाडी घेतली. या सत्रात कोरियाने कमबॅक करण्याच पुरेपूर प्रयत्न केला आणि एक गोल मारला. तेव्हा स्थिती 4-1 अशी झाली.

भारताने यापूर्वी पहिल्यादा 2003 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 4-2 पराभूत केलं आणि विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव केला. या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 7-2 ने धुव्वा उडवला होता. त्यानंतर 2017 मध्ये मलेशियाला 2-1 पराभूत केलं होते. आता 2025 स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.