AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाची किनार, सामना सोडल्यानंतर महेंद्र गायकवाडने मांडली बाजू

महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 स्पर्धेला वादाची किनार लागली. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत जोरदार राडा झाला. दोन्ही वेळेस प्रतिस्पर्धी म्हणून पृथ्वीराज मोहोळ होता. उपांत्य फेरीत शिवराज राक्षेने आक्षेप घेतला. तर अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पंचांच्या निर्णयामुळे संतापला आणि सामना सोडून गेला.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाची किनार, सामना सोडल्यानंतर महेंद्र गायकवाडने मांडली बाजू
| Updated on: Feb 03, 2025 | 7:14 PM
Share

महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मानाची कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेत चांदीची गदा पटकावण्यासाठी कुस्तीपटू वर्षानुवर्षे घाम गाळत असतात. मात्र यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाची किनार लाभली. उपांत्य आणि अंतिम फेरीत जोरदार राडा झाला. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना झाला. या सामन्यात पाठ टेकली नसल्याचं सांगत शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. दुसरीकडे, अंतिम फेरीतही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने सामना सोडला. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या 67 व्या कुस्तीची मानाची गदा पृथ्वीराज मोहोळला मिळाली. दुसरीकडे, शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना पंचांशी वाद घातल्याने त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. दरम्यान अंतिम सामना सोडण्याचं कारण काय? याबाबत कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. अखेर यावर कुस्तीपटू महेंद्र गायकवाड व्यक्त झाला आहे.

कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने आपली बाजू मांडताना सांगितलं की, ‘एकतर कुस्तीची शेवटची 35 सेकंद शिल्लक राहिली होती. त्यात पंचांनी मला वॉर्निंग वगैरे काही दिली नाही. थेट अ‍ॅक्टिव्हिटी पिरियड सुरु केला. 45 सेकंद असल्याशिवाय अ‍ॅक्टिव्हिडी पिरियड सुरु करता येत नाही. पण केला तर केला 16 सेकंद असताना मला सांगितलं गेलं की अ‍ॅक्टिव्हिटी पिरियडची 12 सेकंद सांगितलं गेली. मी फक्त विचारायला गेलो की, अ‍ॅक्टिव्हिटी पिरियड द्यायचा काय संबंध आहे. ते म्हणाले अ‍ॅक्टिव्हिटी पिरियड कुठे सुरु केला आहे आणि स्क्रिनवर 12 सेकंद दाखवत होते. ते म्हणाले तुला बाहेर ढकलेला प्वॉइंट आहे. पण स्क्रिनवर अ‍ॅक्टिव्हिटी पिरियड सुरु होता. हे तुम्ही लाईव्हला पाहू शकता.’

महेंद्र गायकवाड याने सांगितलं की, मी फक्त विचारायला गेलो होतो. तसेच शिवीगाळ केली नाही. ‘मी फक्त जाब विचारला आहे. एवढ्या दिवस आम्ही कष्ट करून काही अर्थ नाही. शेवट असं होत असेल तर काय? कुस्तीत राजकारण चालू आहे.’ असंही पुढे कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याने सांगितलं. आम्ही सगळे मिळून अन्यायाविरुद्ध लढणार असल्याचंही देखील त्याने सांगितलं.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.