AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Corporate Badminton Championship 2025 स्पर्धेच्या माध्यमातून कॉर्पोरेट जगताला मिळणार प्रोत्साहन

पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या सहभागाला चालना देण्यासाठी, ब्रँड प्रतिमा सुधारण्यासाठी आणि खेळाद्वारे नेतृत्व विकासाला चालना देण्यासाठी एक अनोखी संधी या माध्यमातून मिळणार आहे.कनेक्टेड कॉर्पोरेट संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत शीर्ष संस्था सहभागी होत आहेत.

News9 Corporate Badminton Championship 2025 स्पर्धेच्या माध्यमातून कॉर्पोरेट जगताला मिळणार प्रोत्साहन
बॅडमिंटन
| Updated on: May 05, 2025 | 8:13 PM
Share

टीव्ही9 कॉर्पोरेट फुटबॉल कप आणि इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेसच्या यशानंतर टीव्ही9 नेटवर्क त्यांच्या पुढील क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालं आहे. द न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पद्मश्री पुलेला गोपीचंद यांच्या सहकार्याने, तीन दिवसांच्या या क्रीडा महोत्सवाद्वारे कॉर्पोरेट जगताला चालना मिळणार आहे. द न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही. तर वाढत्या कॉर्पोरेट आव्हानांना तोंड देण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या माध्यमातून भारतातील आघाडीच्या संस्थांमधील कर्मचारी स्पर्धा करण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी एकत्र येणार आहेत. जागतिक दर्जाच्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत 9 ते 11 मे 2025 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या त्याचबरोबर एक सखोल संदेश दिला जाणार आहे.

पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, साई प्रणीत, पारुपल्ली कश्यप, श्रीकांत किदाम्बी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू घडले आहेत. या अकादमीत खेळण्याची संधी मिळणं म्हणजे अद्भुत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी एक वेगळा अनुभव असेल. भारतीय क्रीडा क्षेत्रात या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. कारण ते शिस्त, समर्पण आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.

न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कॉर्पोरेट्सनी का भाग घ्यावा?

न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही केवळ एक स्पर्धा नाही तर त्यापेक्षाही त्याचं महत्त्व अधिक आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या सहभागाला चालना देण्याची, ब्रँड मूल्यांचे प्रदर्शन करण्याची, खेळाद्वारे नेतृत्वगुण निर्माण करण्याची आणि देशातील शीर्ष संस्थांशी नेटवर्किंग करण्याची एक अनोखी संधी या माध्यमातून मिळणार आहे. ही स्पर्धा आरोग्य, उत्कृष्टता आणि संतुलित जीवनशैलीसाठी वचनबद्धता दाखवून कॉर्पोरेटना संघाचे मनोबल वाढविण्यास, निष्ठा निर्माण करण्यास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यास मदत करेल.

भारतातील काही आघाडीच्या संस्था जसे की डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, ई अँड वाय, टाइम्स ऑफ इंडिया, ब्रॉड्रिज, कॅपजेमिनी, जेनपॅक्ट, फिनमार्केट, एसपीए सॉफ्टवेअर, एक्सेंचर, श्रॅडिंजर, मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नॅशनल अकादमी ऑफ कन्स्ट्रक्शन, गार्डियन सिक्युरिटीज, हाय रेडियस, आर्सेसियम, वेल्स फार्गो, दिल्ली पब्लिक स्कूल, पल्लवी इंटरनॅशनल स्कूल, आर्सेसियम, ओल्गा टेक्नॉलॉजीज, एडीपी, ग्रोथ स्टोरीज, डॉ. केअर इत्यादी आधीच टीव्ही9 च्या ऐतिहासिक कॉर्पोरेट चळवळीत सामील झाल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.