Olympics 2024 Highlights And Update: हॉकी टीम इंडियाची कांस्य पदकाची लढत, नीरज चोप्राचा महामुकाबला, विनेशचा अंतिम निर्णय, गुरुवारी काय काय?

Paris Olympics 2024 7 August Updates Highlights In Marathi: पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 12 वा दिवस वाईट स्वप्नासारखा राहिला. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. तर रात्री उशिरा मीराबाई चानू आणि अविनाश साबळे पदक जिंकण्यात अपयशी ठरले.

Olympics 2024 Highlights And Update: हॉकी टीम इंडियाची कांस्य पदकाची लढत, नीरज चोप्राचा महामुकाबला, विनेशचा अंतिम निर्णय, गुरुवारी काय काय?
hockey india neeraj chopra and vinesh phogat
| Updated on: Aug 08, 2024 | 2:40 AM

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील आजचा (7 ऑगस्ट) 12 वा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला.  विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याने भारताला मोठा झटका लागला. त्यानंतर भारताच्या खेळाडूंना वैयक्तिक सामन्यांमध्ये जिंकण्यात अपयश आलं. बीडच्या अविनाश साबळे याचा 8 ऑगस्ट रोजी सामना झाला. अविनाश 3 हजार स्टीपलचेजमध्ये 11 व्या स्थानी राहिला. तर वेटलिफ्टर मीराबाई चानूला 4 चौथ्या स्थानी समाधान मानवं लागलं. त्याआधी सांघिक आणि वैयक्तिक प्रकारातील सामन्यांमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी राहिली. आता विनेशने आपल्याला रौप्य पदक देण्यात यावं, या मागणीसाठी क्रीडा न्यायलयात धाव घेतली आहे. याबाबतचा निर्णय हा गुरुवारी (8 ऑगस्ट) होणार आहे. तसेच हॉकी टीम इंडियाचा कांस्य पदकाचा सामना आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा अंतिम फेरीतील सामना गुरुवारी होणार आहे.   त्यामुळे गुरुवार भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Aug 2024 02:23 AM (IST)

    भारताचं 13 व्या दिवसाचं वेळापत्रक

    टीम इंडिया पॅरिस ऑलिम्पिमध्ये अनेक सामने खेळणार आहे. मात्र भारताचं 2 सामन्यांकडे लक्ष असणार आहे. हॉकी इंडिया कांस्य पदकासाठी भिडणार आहे. तर भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा अंतिम फेरीतील सामनाही होणार आहे. तसेच विनेश फोगाट हीच्या संयुक्तरित्या रौप्य पदकाच्या विनंतीवर निर्णय येणार आहे. त्यामुळे 8 ऑगस्ट भारतासाठी निर्णय दिवस ठरणार आहे.

    भारताचं 8 ऑगस्टचं वेळापत्रक

  • 08 Aug 2024 02:11 AM (IST)

    भारतीय खेळाडू 12 व्या दिवशी अपयशी

    भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधील 12 वा दिवस हा अतिशय वाईट असा राहिला. बीडचा अविनाश साबळे हा 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात 11 व्या स्थानी राहिला. तर वेटलिफ्टर मीराबाई चानू हीचं कांस्य पदक अवघ्या एका स्थानाने हुकलं. मीराबाईला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. मीराबाई आणि अविनाश या दोघांचा सामना हा 8 ऑगस्टला खेळवण्यात आला. त्याआधी 7 ऑगस्टला अंतीम पंघाल पहिल्याच फेरीत पराभूत झाली. ज्योती याराजी ही 8 पैकी सातव्या स्थानी राहिली. टेबल टेनिस महिला संघांचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. महिला भालाफेकपटू शेवटून दुसरी राहिली. तिला 15 व्या स्थानी समाधान मानावं लागलं. तर महाराष्ट्राचा सर्वेश कुशार हे उंच उडी प्रकारातील पहिल्याच फेरीतून बाद झाला. तर विनेश फोगाट हीने क्रीडा न्यालयात धाव घेत आपल्याला संयुक्तरित्या रौप्य पदक विजेता जाहीर करावं, अशी विनंती केली आहे. या विनंतीवर गुरुवारी निर्णय येणार आहे.

  • 08 Aug 2024 01:27 AM (IST)

    अविनाश साबळे मेडल जिंकण्यात अपयशी

    महाराष्ट्रातील बीडमधील अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्यात अपयशी ठरला आहे. अविनाश साबळे 3000 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात 11 व्या स्थानी राहिला.

  • 08 Aug 2024 01:20 AM (IST)

    मीराबाई चानू पदक जिंकण्यात अपयशी

    वूमन वेटलिफ्टर मीराबाई चानू पदक जिंकण्यात अपयशी ठरली आहे. मीराबाईने पदक जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र तिचे प्रयत्न अपुर पडले. मीराबाई चौथ्या स्थानी राहिली.

  • 08 Aug 2024 12:11 AM (IST)

    मीराबाईची स्नेचमधील कामगिरी

    पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हीचा सामना सुरु आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात स्नेचमधील पहिल्या प्रयत्नात 85 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरली. दुसऱ्या प्रयत्नात मीराबाई 88 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. त्यानंतर मीराबाईने तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात 88 किलो वजन उचललं आहे. स्नेचमध्ये खेळाडू वजन उचलून वर धरतात. आता त्यानंतर क्लिन एन्ड जर्क प्रकाराला सुरुवात होणार आहे. क्लिन एन्ड जर्क प्रकारात खेळाडूला आधी खांद्यापर्यंत वजन उचलावं लागतं, त्यानंतर लगेचच हातवर करुन वजन डोक्यावर घेऊन जायचं असतं.

  • 07 Aug 2024 10:03 PM (IST)

    भारताची 7 ऑगस्टची आतापर्यंतची कामगिरी, एकही पदक नाही

    भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधील 12 वा दिवस आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. मुळात दिवसाची सुरुवातच ही वाईट झाली. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट वाढीव वजनामुळे अपात्र ठरली. त्यामुळे विनेशला कोणतही पदक मिळणार नाही. अंतीम पंघाल पहिल्याच फेरीत पराभूत झाली. ज्योती याराजी ही 8 पैकी सातव्या स्थानी राहिली. टेबल टेनिस महिला संघांचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. महिला भालाफेकपटू शेवटून दुसरी राहिली. तिला 15 व्या स्थानी समाधान मानावं लागलं. तर महाराष्ट्राचा सर्वेश कुशार हे उंच उडी प्रकारातील पहिल्याच फेरीतून बाद झाला.

     

  • 07 Aug 2024 06:49 PM (IST)

    मीराबाई-अविनाश साबळे कडून भारतीय चाहत्यांना आशा, सामना केव्हा?

    महिला पैलवान विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यांतर आता भारतीयांना मीराबाई चानू आणि अविनाश साबळे या दोघांकडून आशा आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि ॲथलेटिक्समध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे यांना पदकाची संधी आहे. मीराबाईच्या सामन्याला आज रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. तर अविनाश साबळे याच्या सामन्याला रात्री 1 वाजून13 मिनिटांनी सुरुवात होईल.

  • 07 Aug 2024 05:17 PM (IST)

    जर्मनीची टीम इंडियावर मात

    भारतीय महिला संघाला टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. जर्मनीने भारतावर मात केली आहे.

     

  • 07 Aug 2024 04:17 PM (IST)

    अंतिम पंघालचं पराभवासह आव्हान संपुष्टात

    महिला कुस्तीपटू अंतिम पंघल पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. अंतिमचा राऊंड ऑफ 16 मध्ये तुर्कीच्या कुस्तीपटूकडून पराभव स्वीकारावा लागला.

  • 07 Aug 2024 02:53 PM (IST)

    भारताचं 12 व्या दिवसाचं वेळापत्रक

    महिला पैलवान विनेश फोगाट अपात्र ठरल्याने भारताचं हक्काचं पदक कमी झालं आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. अशात आता इतर खेळाडूंकडून भारतीयांना पदकाची आणि विजयाची आशा असणार आहे. जाणून घ्या भारताचं 7 ऑगस्टचं वेळापत्रक.

    टीम इंडियाचं 7 ऑगस्टचं वेळापत्रक

  • 07 Aug 2024 02:51 PM (IST)

    भारताची सुवर्णसंधी हुकली! विनेश फोगाट अपात्र

    भारताला ऑलिम्पिक स्पर्धेतील 12 व्या दिवशी चौथं आणि ते ही रौप्य पदक मिळणार आहे. महिला पैलवान विनेश फोगाट हीने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केलं होतं. त्यामुळे आजचा बुधवारचा दिवस हा भारतासाठी ऐतिहासिक ठरणार होता. विनेशचा अंतिम सामना होणार होता. विनेशचं रौप्य पदक हे निश्चितच होतं.त्यामुळे विनेशला तिरंगा आणि रौप्य पदकासह पाहण्यासाठी भारतीय उत्सुक होते. मात्र बुधवारी भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली. विनेशला वाढीव वजनामुळे थेट अपात्रच करण्यात आलं. मिळाले्लया माहितीनुसार विनेशचं 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्याने तिला अपात्र करण्यात आलं. त्यामुळे भारताचं हक्काचं रौप्य पदकही गेलं. तर ‘सुवर्ण’संधीही हुकली.