Sachin Khilari : महाराष्ट्राच्या सचिनची ऐतिहासिक कामगिरी, भारताला गोळाफेकीत 1984 नंतर पहिलं पदक
Paris Paralympics 2024: महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेतील सातव्या दिवशी इतिहास रचला आहे. सचिन खिलारी भारताला गोळाफेकीत पदक मिळवून देणारा दुसरा पुरुष एकूण तिसरा खेळाडू ठरला.
पॅरालिम्पिकमध्ये भारताची धमाकेदार कामगिरी सुरुच आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील सातव्या दिवशीही भारताने पदकांचं खातं उघडलं आहे. भारताने यासह पदकांबाबत 20 पार मजल मारली आहे. भारताला महाराष्ट्राच्या पठठ्याने 21 वं पदक मिळवून दिलं आहे. सचिन खिलारी याने भारताला पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत रौप्य पदक मिळवून दिलं आहे. सचिनने गोळाफेकीत एफ 46 कॅटेगरीत 16.32 मीटर लांब थ्रो फेकला. सचिन यासह या कॅटेगरीत इतरा लांब थ्रो फेकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला. तसेच तर कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्ट याने 16.38 थ्रोसह सुवर्ण पदकाची कमाई केली.
भारताकडून शॉटपुट प्रकारात सचिनसह एकूण तिघे सहभागी झाले होते. मात्र मोहम्मद यासर आणि रोहित कुमार हे दोघे अपयशी ठरले. मोहम्मद यासरने 14.21 मीटर लांब थ्रो केला. तर रोहित कुमारने 14.10 असा थ्रो केला. यासह दोघे अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी राहिले. तर सचिनने दुसऱ्या प्रयत्नात 16.32 मीटर लांब थ्रो फेकला. सचिनने यासह रौप्य पदक निश्चित केलं. सचिनचं यासह मानाच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे.
सचिन तिसराच भारतीय
Silver Stunner! 🥈🇮🇳
Sachin Khilari smashes the Asian record with a phenomenal 16.32m throw in Men’s Shot Put F46 at #ParalympicGamesParis2024! 🔥 Keep watching the live action on #JioCinema 👈#ParalympicsOnJioCinema #JioCinemaSports #Paris2024 #ShotPut #Paralympics pic.twitter.com/N8BSPkkXZN
— JioCinema (@JioCinema) September 4, 2024
सचिन भारताला पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत 40 वर्षांनंतर पदक मिळवून देणारा दुसरा पुरुष तर एकूण तिसरा खेळाडू ठरला. सचिनआधी जोगिंदर सिंह आणि दीपा मलिक या दोघांनी ही कामगिरी केली होती. जोगिंदर सिंह यांनी 1984 मध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं. तर दीपा मलिक हीने 2016 मध्ये रियो पॅरालिम्पिकमध्ये मेडल पटकावलं होतं.
भारताकडे 21 पदकं
दरम्यान सचिनने जिंकलेलं रौप्य हे सातवं तर एकूण 21 वं पदक ठरलं. भारताने आतापर्यंत पॅरिस पॅरॉल्मिपिकमध्ये सर्वाधिक 11 कांस्य पदकं मिळवली आहेत. त्यानंतर भारताला 7 रौप्य पदक मिळवण्यात यश आलं. तर भारताच्या खात्यात 3 गोल्ड मेडल्सही आहेत.