India vs Kuwait, SAFF Championship Final 2023 | टीम इंडिया नवव्यांदा चॅम्पियन, थरारक सामन्यात कुवैतवर मात
Saff Championship 2023 Final India vs Kuwait | फुटबॉल टीम इंडियाने इतिहास रचला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतवर मात करत टीम इंडिया नवव्यांदा चॅम्पियन ठरली आहे.

बंगळुरु | फुटबॉल टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने रंगतदार झालेल्या सामन्यात कुवेतवर विजय मिळवला आहे. यासह टीम इंडिया नवव्यांदा चॅम्पियन ठरली आहे. दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशीप फायनलचं आयोजन हे बंगळुरुतील कांतिरवा स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लावण्यात आला. या पेनाल्टी शूटआऊटमध्ये टीम इंडियाने कुवेतचा 5-4 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळलला. टीम इंडियाने सुनिल छेत्री याच्या नेतृ्त्वात ही कामगिरी केली. टीम इंडियाच्या या विजयामुळे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
टीम इंडिया लेबाननला पराभूत करत अंतिम फेरीत पोहचली होती. टीम इंडियाने लेबनानवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने विजय मिळवला होता. हा सामना 1 जुलै रोजी पार पडला. त्याआधी टीम इंडियाने नेपाळ आणि पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
या महाअंतिम सामन्यात 90 मिनिटांच्या मुख्य खेळात टीम इंडिया आणि कुवेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. त्यामुळे अतिरिक्त 30 मिनिटांचा खेळ झाला. इथे दोन्ही संघांनी एकमेकांना गोल करण्यापासून रोखलं. त्यामुळे पेन्लटी शूटआऊटद्वारे विजेता ठरवण्यात आला. टीम इंडियाचा गोलकिपर गुरप्रीत सिंह याने विजयात निर्णायक भूमिका बजावली.
पेन्लटी शूटआऊट थरार
2⃣ Successful Penalty Shoouts in a row! INDIA ?? ARE THE SAFF CHAMPIONS AGAIN! ?
KUW 1⃣-1️⃣ IND
??: ❌ ✅ ✅ ✅ ✅ ❌??: ✅ ✅ ✅ ❌ ✅ ✅
? @FanCode & @ddsportschannel ?#KUWIND ⚔️ #SAFFChampionship2023 ? #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/pmm0mT3gcA
— Indian Football Team (@IndianFootball) July 4, 2023
पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी 5 गोल करण्याची संधी मिळते. या संधीचं दोन्ही संघांकडून फायदा घेतला गेला. दोन्ही संघांची 4-4 अशी स्थिती झाली. त्यानंतर महेश याने पाचवा आणि निर्णायक गोल केला. तर गोलकिपर गुरप्रीत सिंह याने शानदार पद्धतीने कुवेतकडून करण्यात आलेला गोल रोखला. अशा प्रकारे टीम इंडिया नवव्यांदा चॅम्पियन ठरली.
टीम इंडिया नवव्यांदा चॅम्पियन
?? INDIA are SAFF ????????? for the 9️⃣th time! ?
? 1993? 1997? 1999? 2005? 2009? 2011? 2015? 2021? ????#SAFFChampionship2023 #BlueTigers ? #IndianFootball ⚽ pic.twitter.com/3iLJQSeyWG
— Indian Football Team (@IndianFootball) July 4, 2023
दरम्यान टीम इंडियाने एकूण नवव्यांदा दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशीप जिंकण्याचा मान पटकवाल आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 साली सॅफ चॅम्पिनशीप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.
टीम इंडियावर या चित्तथरारक सामन्यातील विजयानंतर सर्वच क्षेत्रातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे या आणि अशा बड्या नेत्यांनी अभिनंदन केलंय. टीम इंडियाची फिफा रँकिंग 100 आणि कुवेतची 141 इतकी आहे.
