SAFF Championship 2023 Video : भारत विरुद्ध पाकिस्तान फुटबॉल सामन्यात धक्काबुक्की, काय झालं ते पाहा मैदानात
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हंटलं की आक्रमकता आलीच. मग तो क्रिकेटचा सामना असो की इतर कोणताही. असाच काहीसा अनुभव भारत विरुद्ध पाकिस्तान फुटबॉल सामन्यात आला.

मुंबई : सौदी अरेबियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना सुरु आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हंटलं की आक्रमता ही असतेच. ही आक्रमकता फुटबॉलच्या मैदानात पाहायला मिळाली. फुटबॉलच्या मैदानात दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भिडले. याला कारण ठरलं ते भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक… पाकिस्तानच्या खेळाडूकडून चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडल्याच प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू आमनेसामने आले आणि धक्काबुक्की झाली. यासाठी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना रेड कार्ड दाखवण्यात आले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान पहिला डाव
भारताने पहिल्या डावापासून आक्रमक सुरुवात केली. पहिल्या डावाच्या 10 व्या मिनिटाला कर्णधार सुनिल छेत्रीने गोल केला आणि 1-0 अशी आघाढी घेतली. त्यानंतर 15 व्या मिनिटाला दुसरा गोल करत 2-0 ने आघाडी घेत पाकिस्तानवर दबाव आणला. यामुळे पाकिस्तानचे खेळाडू सैरभैर झाले. सामन्याच्या 45 व्या मिनिटाला असं काही घडलं की पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपला राग व्यक्त केला.
Whether it's Cricket or Football,India vs Pakistan is?#INDvsPAK #INDPAK pic.twitter.com/6IFiJYFMVa
— Lavdeep18 (@CricLavdeep1845) June 21, 2023
टचलाइनजवळ असलेल्या भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल्ला इकबाल याच्याकडून फुटबॉल हिसकावून घेतला. यानंतर रहीस नबीसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आमनेसामने आहे आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने खेळाडूंना शांत केलं.

दोन्ही संघाचे खेळाडू
भारतीय संघ : अमरिंदर सिंह, सुनील छेत्री, शुभाषिश बोस, अन्वर अली, संदेश जिंगान, अनिरुध्द थापा, अब्दुल समद, जिक्सन सिंग, लल्लीन्जुला छांगटे, प्रितम कोटल, आशिक कुरुनियन
पाकिस्तानचा संघ : साकिब हानिफ, इसाह सुलिमन, मुहम्मद उमर हयात, मुहम्मद सुफयान, अब्दुल्ला इकबाल, ममून मूस्सा खान, ओटिस जान, मोहम्मद खान, रहिस नबी, हस्सन नवीद बशीर, हरुन आरशिद हमिद, अली उझैर महमूद
