AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 CBC 2026: टीव्ही9 बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचं दुसरं पर्व, 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

टीव्ही 9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचं यंदा दुसरं पर्व आहे. या पर्वाची मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. हैदराबादच्या गोपीचंद अकादमीत या स्पर्धेत आयोजन करण्यात आलं आहे. तसेच मोठमोठ्या कंपन्यांचे स्पर्धेक यात सहभागी झाले आहे. 17 मे पर्यंत ही स्पर्धा असणार आहे.

TV9 CBC 2026: टीव्ही9 बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचं दुसरं पर्व, 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
TV9 CBC 2026: टीव्ही9 बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचं दुसरं पर्व, 300हून अधिक स्पर्धकांचा सहभागImage Credit source: TV9 Network
| Updated on: May 16, 2026 | 4:16 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली आहे. पहिल्या पर्वातील यशानंतर भाग घेणाऱ्या खेळाडूंचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे मागच्या पर्वाच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले आहेत. जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या आयटी आणि इतर दिग्गज कंपन्या या स्पर्धेत भाग घेत आहेत. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि इन्फोसिससारख्या अग्रगण्य कंपन्या या स्पर्धेत उतरल्या आहेत. मागच्या पर्वात गूगल, डेल, उबेर, माय होम, आयकिया, डेलॉइट आणि डॉ रेड्डीज या सारख्या 64हून अधिक कंपन्यांनी भाग घेतला होता. तेव्हा 1000हून अधिक सामन्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. यंदाही हैदराबादमधील गाचीबोवली येथील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. ही स्पर्धा 17 मेपर्यंत असणार असून प्रत्येक सामना रंगतदार होत आहे.

300हून अधिक स्पर्धकांचा भाग

टीव्ही9 कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेला यंदाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या संख्याने कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. या चॅम्पियनशिप स्पर्धेत 300हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनात होत आहे.

टीव्ही९ बॅडमिंटन

सामने आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात आले आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या गोपीचंद अकादमीत खेळण्याची संधी मिळाल्याने कॉर्पोरेट कंपन्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंचा कामाचा तणाव यामुळे कमी होत आहे. इतकंच काय तर खेळाप्रती आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत आहे.

टीव्ही९ बॅडमिंटन

एकेरी बॅडमिंटन स्पर्धेसाठी हे खेळाडू ठरले पात्र

  • सेपियन्स – श्रीरंगराजन एन
  • अमेझॉन – लावी मुलचंदानी
  • मायक्रोसॉफ्ट – इशर मेनन
  • व्हीएनआरव्हीजेआयईटी – डॉ. शैलजा
  • फिनएमकेटी – वर्षिता
  • मॅक्रो ग्रुप – ज्ञानेश्वरी
  • एन रंगा राव अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड – चिन्मयी
  • मायक्रोसॉफ्ट – शेली जलोरी

या चॅम्पियनशिपच्या विजेत्यांना एक चषक आणि एकूण 5 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. यामध्ये दोन मुख्य गट आहेत.

सांघिक चॅम्पियनशिप: पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत दोन एकेरी आणि एक दुहेरी सामना असेल. एका संघात किमान तीन आणि कमाल पाच सदस्य असणे आवश्यक आहे. सर्व सदस्य एकाच संस्थेचे असणे बंधनकारक आहे.

खुला गट: यामध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या संस्थांचे खेळाडू देखील या गटात दुहेरी म्हणून सहभागी होऊ शकतात.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...