AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, विनेश फोगाटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता, काही वेळात घोषणा?

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटसह सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिक इतिहासामध्ये 50 किली वजनी गट फ्रीस्टाईल कुस्तीच्या प्रकारामध्ये विनेश फोगाटने अंतिम फेरी गाठली होती. मात्र 100 ग्रॅम वजन जास्त वाढल्याने तिला अपात्र करण्यात आलं. विनेशने आयओसीच्या निर्णयाला क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) आव्हान दिलं होतं. या लढ्याला यश आल्याचं दिसत असून तशी माहिती समोर आली आहे.

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, विनेश फोगाटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता, काही वेळात घोषणा?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 08, 2024 | 4:44 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजन गटात फायनलमध्ये प्रवेश केल्यावर अपात्र ठरवण्यात आलं होतं. फायनल सामन्याआधी विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आलं.  या निर्णयामुळे सर्व भारतीयांना धक्का बसला होता. संघर्ष करत फायनल गाठलेल्या विनेशनेही कुस्तीमधून निवृत्तीची घोषणी केली. अशातच सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

विनेश फोगाटने फायनलसाठी अपात्र करण्याच्या आयओसीच्या निर्णयाला क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) आव्हान दिलं आहे. विनेशने अपील केलं असून फायनल सामना किंवा संयुक्त रौप्य पदक द्यावे, असं आवाहन केले गेले होते. अशातच विनेश फोगाटचे हे अपील मान्य केल्याची माहिती सजमत आहे. याबाबत CAS लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

विनेश फोगटला अपात्र का करण्यात आले?

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो गटात सेमी फायनल जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला होता. अशी कामगिरी करणारी ती देशातील पहिली कुस्तीपटू ठरली होती. संपूर्ण देश फायनल सामन्याची वाट पाहत होता. फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र विनेश अपात्र झाल्याची बातमी आली सर्वांनाच धक्का बसला. बुधवारी सकाळी फायनल सामन्याआधी तिचे सकाळी 7:15 वाजता विनेशचे वजन करण्यात आले होते. त्यावेळी तिचे वजन 50 किलो 100 ग्रॅम भरले होते. त्यामुळे तिला फायनलआधी अपात्र ठरवण्यात आलं.

विनेश फोगाटची पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरी

विनेशने पहिल्याच सामन्यात चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या युई सुसाकीचा 3-2 ने पराभव केला. त्यानंतर युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 ने पराभव करत सेमी फायनल गाठली. या सेमी फायनल सामन्यामध्ये 5-0 ने क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव करत फायनल गाठली होती. आता सुवर्णपदकापासून विनेश फोगाट एक पाऊल दूर होती. मात्र सेमी फायनल सामन्यानंतरचे पुढचे बारा तास सर्व काही बदलवून टाकणारे होते. फायनलपर्यंत वाघिणीसारखी लढत आलेली  विनेश फोगाट फक्त 100 ग्रॅम वजन जास्त झाल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं.

दरम्यान, विनेश फोगाटबाबत ऑलिम्पिकमध्ये घेतलेल्या निर्णयावर देशी आणि विदेशी कुस्तीपटूंनी आपली मते मांडलीत. यामध्ये काहींनी तिच्यावर अन्याय  झाल्याचं म्हटलं. तर काहींनी तिला रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...