कोणत्या प्राण्याचे मांस खातो पाकिस्तानचा हा बाहुबली क्रिकेटर, नाव वाचून व्हाल थक्क!

सध्या पाकिस्तानचा तरुण खेळाडू समीर याची सगळीकडे चर्चा आहे. तो मैदानात आला सगळीकडे चौकार, षटकार यांचा पाऊस पडतो. त्याच्या डायटची सगळीकडे चर्चा होते.

कोणत्या प्राण्याचे मांस खातो पाकिस्तानचा हा बाहुबली क्रिकेटर, नाव वाचून व्हाल थक्क!
sameer minhas
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 15, 2026 | 8:15 PM

Sameer Minhas : सध्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली. या विश्वचषकात प्रत्येक देशाचे तरुण आणि युवा खेळाडू आपला दमदार खेळ करताना दिसत आहेत. काही खेळाडू तर फलंदाजी करताना षटकार आणि चौकार यांचा पाऊस पाडत आहेत. दरम्यान याच विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा तरुण खेळाडू समीर मिन्हास याची जगभरात चर्चा होत आहे. हा खेळाडू मैदानात चौकार, षटकार लगावताना दिसतोय. विशेष म्हणजे हा खेळाडू शरीरानेही चांगलाच तंदुरुस्त आहे. त्यामुळेच समीर त्याच्या आहारात नेमका कोण-कोणत्या पदार्थांचे सेवन करतो? तसेच तो नेमकं कोणतं मटण खातो? असं विचारलं जात आहे.

समीर लाल मांस तसेच मटण खातो का?

समीर मिन्हास त्याचा डायट प्लॅन तंतोतंत पाळतो. त्यामुळेच त्याचे शरीर एकदम तंदुरुस्त आहे. फलंदाजी करताना मोठे फटके मारायचे असतील तर तुमच्यात ताकद असणे गरजेचे आहे. त्यामुळेच तो जेवणाबाबतचे नियम तंतोतंद पाळतो. समीरच्या आहारात प्रामुख्याने प्रोटीन, कार्ब्स, व्हिटॅमीन यांचा समावेश असणारे अन्नपदार्थ असतात. लाल मांस तसेच मटण यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. परंतु शरीराला प्रोटीन मिळावे यासाठी तो लाला मांस किंवा मटण खात नाही. त्याएवजी तो चिकन, मासे खाण्याला प्राधान्य देतो. बिफ किंवा पोर्कचे सेवन तो कधी-कधीच करतो.

खाद्यपदार्थ, बिर्याणी, मिठाई यापासून राहतो दूर

शरीरात कार्ब्सचे प्रमाण चांगले असावे यासाठी तो भात, पुलाव, पास्ता असे पदार्थ खातो. विशेष म्हणजे जास्त तेल असलेले खाद्यपदार्थ, बिर्याणी, मिठाई यापासून तो दूर असतो. समीरच्या आहारात काही फळंदेखील असतात. सोबतच तो फळभाज्याही आवडीने खातो. यामुळे त्याला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. यामुळे त्याला ताकद तर मिळतेच सोबतच प्रतिकारशक्तीही वाढते.

मैदानावर जोरदार जोरदार कामागिरी

दरम्यान, या सर्व पदार्थांचे आहारात योग्य प्रमाण असल्यामुळेच समीर मिन्हास आज मैदानावर जोरदार कामागिरी करताना दिसतो. तो भविष्यात पाकिस्तानी संघाचा सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असू शकतो, असे भाकित व्यक्त केले जात आहे. याआधी बाबर आझम यासारखे खेळाडूही पाकिस्तानला मिळालेला आहेत. असे असताना आता समीर नावाच्या या नव्या खेळाडूचा उदय पाकिस्ताला पुरक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भविष्यात हा खेळाडू अशीच कामगिरी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.