
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील फॉर्महाऊसवर 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर तिने संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. संगीत, हळद आणि पलाशच्या नावाची मेहंदीही स्मृती मानधना हिने हातावला लावली. लग्नाला काही तास शिल्लक असताना असे काही घडले की, थेट हे लग्न मोडल्याचे जाहीर केले. सुरूवातीला स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब असल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सर्वांना सांगितले. स्मृती मानधनाच्या वडिलांपाठोपाठ पलाश मुच्छल यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वडिलांच्या तब्येतीचे फक्त कारणच सांगण्यात आले. खरे कारण काहीतरी वेगळेच लग्न पुढे ढकलण्याचे असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या.
शेवटी स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याचे सांगितले आणि हा विषय माझ्यासाठी इथेच संपल्याचेही तिने स्पष्ट शब्दात सांगितले. पलाश मुच्छल याने स्मृती मानधना हिला धोका दिल्याचे सांगितले जाते. यादरम्यान त्याचे काही स्क्रीनशॉर्टही व्हायरल होताना दिसली. स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचे जाहीर केल्यानंतर पलाश यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले.
आता भावाचे लग्न स्मृती मानधना हिच्यासोबत मोडल्यानंतर पहिल्यांदाच पलाश मुच्छल याच्या बहिणीने यावर भाष्य केले. कुटुंबात नक्की काय सुरू आहे हे देखील तिने सांगितले. पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छल ही मेहंदी, संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसली. आता तिने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पलक स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली.
पलक मुच्छल म्हणाली की, कुटुंबासाठी हा खरोखरच अत्यंत कठीण काळ आहे. हळूहळू करून संपूर्ण कुटुंब आता यामुळे बाहेर येत आहे. सकारात्मक गोष्टींवर आमचा विश्वास आहे. सकारात्मक गोष्टी होतील. सर्व परिस्थितीला आम्ही ताकदीने पुढे जात आहोत. पहिल्यांच पलक मुच्छल ही बोलताना दिसली. कुटुंबासाठी नक्कीच कठीण वेळ असल्याचे तिने म्हटले आहे. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न तुटल्यानंतर दोन्ही कुटुंबाला मोठा धक्का बसला. लग्नासाठी आलेले पाहुणे देखील निराश होऊन गेली.