पलाश मुच्छल याच्या मदतीला धावले थेट सांगलीकर, स्मृती मानधना हिच्या निर्णयानंतर थेट…

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न तुटले आहे. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. संगीत, हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम मस्त झाला. मात्र, त्यानंतर लग्न पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले. आता हे लग्न रद्द झालंय.

पलाश मुच्छल याच्या मदतीला धावले थेट सांगलीकर, स्मृती मानधना हिच्या निर्णयानंतर थेट...
palash muchhal tattoo
| Updated on: Dec 09, 2025 | 1:20 PM

क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी गायक पलाश मुच्छल याच्यासोबत सांगलीत होते. हळद, संगीत आणि मेहंदी धडाक्यात झाली. मात्र, लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर पलाश मुच्छल याचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल होताना दिसली आणि एकच खळबळ उडाली. पलाश हा स्मृती मानधनाला धोका देत असल्याचे त्यावरून सांगितले गेले. स्मृतीच्या वडिलांपाठोपाठ पलाशला रूग्णालयात दाखल करण्यात आले. शेवटी 7 डिसेंबर 2925 रोजी स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याचे जाहीर केले. मात्र, लग्न मोडण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून स्मृती मानधना आणि पलाश एकमेकांना डेट करत होते. मात्र, यादरम्यान पलाश इतरही काही मुलींना बोलत असल्याचे सांगितले जाते. तो स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा व्हायरल स्क्रीनशॉर्टदरम्यान केला गेला. पलाशचा खरा चेहरा कळाल्यानंतरच स्मृती मानधना हिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना हिच्या पोस्टनंतर पलाशनेही एक पोस्ट शेअर केली.

स्मृती मानधना आणि पलाश या दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. मात्र, स्मृती मानधना हिच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर स्मृती मानधनाला लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. स्मृती मानधना हिच्यासाठी खास एक टॅटू पलाश मुच्छल याने हातावर काढला होता. आता लग्न मोडल्यानंतर पलाश टॅटूचे काय करणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. हेच नाही तर त्यावरून अनेक लोक त्याला सल्ला देताना दिसत आहेत.

पलाश मुच्छल याच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत एकाने लिहिले की, सांगलीत टॅटू रिमूव्हल सेंटर पाहिजे असेल तर मला सांग… पलाश मुच्छल हा स्मृती मानधना हिच्यासोबत लग्न तुटल्यापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे. मात्र, तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. स्मृती मानधना हिच्यासोबत अशाप्रकारे लग्न तुटल्यानंतर तो नक्की टॅटूचे काय करणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. लग्नापूर्वी कायमच एकच स्पॉट होताना स्मृती मानधना आणि पलाश दिसत.