
वर्ल्ड कप विजेत्या महिला टीम इंडियाने काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 7 कल्याण मार्ग निवासस्थानी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाचं स्वागत केलं. वर्ल्ड कपमध्ये सलग तीन पराभवानंतर कमबॅक केल्याबद्दल पीएम मोदींनी खेळाडूंच कौतुक केलं. वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवणाऱ्या दीप्ती शर्मासाठी पीएम मोदींनी DSP शब्दांचा वापर केला. कारण दीप्ती शर्मा यूपी पोलीसमध्ये डीएसपी पदावर आहे. मेहनत करणं बंद करु नकोस, असं पीएम मोदींनी 2017 साली सांगितलं होतं, ती आठवण दीप्तीने यावेळी सांगितली. ‘मी तुमची भाषणं ऐकते, त्यातून मला ताकद मिळते’ असं दीप्ती पुढे म्हणाली.
त्यावर पीएम मोदी लगेच बोलले की, “तुम्ही हनुमानाचा टॅटू काढलाय त्यातून मदत मिळत असेल. असं ऐकलय की, तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये जय श्री राम लिहिलय” त्यावर दीप्तीने हसून सांगितलं की, ‘त्यातून मला शक्ती मिळते’. 2017 साली ट्रॉफी शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती, तो क्षण कॅप्टन हरमनप्रीत कौरने आठवला. ‘आता आम्ही ट्रॉफी घेऊन आलोय. पुढेही भेटण्याची इच्छा आहे’ उपकर्णधार स्मृती मांधना म्हणाली की, ‘पंतप्रधानांनी मला प्रेरित केलय. ते सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत’
भारतीय महिला संघाने पीएम मोदींना काय स्पेशल गिफ्ट दिलं?
भारतीय महिला टीमने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक स्पेशल जर्सी गिफ्ट केली. जर्सीच्या पाठिमागे ‘नमो'(नरेंद्र मोदी) लिहिलेलं. सोबतच 16 खेळाडूंची स्वाक्षरी सुद्धा त्यावर आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमने मंगळवारी संध्याकाळी पीएम मोदींची भेट घेतली. रविवारी भारतीय महिला संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 52 धावंनी हरवून पहिल्यांदा आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकला.