
सांगलीची कन्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांचा शाही विवाह सोहळा 23 तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी सांगलीतील कवठेपिरांन रोड येथील मानधना फार्म हाऊस सजवण्यात आले आहे. काल या ठिकाणी रात्री हळदीचा समारंभ संपन्न झाला. आज मेहंदीचा आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी अचानक पोलीस आणि डॉगस्कॉड फार्महाऊसवर पोहोचले आहेत.
फार्महाऊसवर डॉग स्कॉड पथक दाखल
स्मृती मानधानाचा विवाहसोहळा पार पडणार असलेल्या फार्महाऊसवर सांगली पोलीस दलाच्या वतीने बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथक दाखल झाला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर या शाही विवाह सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे या डॉग्सच्या माध्यमातून विवाह स्थळाची संपूर्ण तपासणी आणि पाहणी करण्यात येत आहे. पण अचानक पोलीस आणि डॉग स्कॉड आल्यामुळे सर्वजण सुरुवातीला घाबरले. नंतर केवळ तपासाचा भाग असल्यामुळे पुन्हा सर्वजण आनंदाने मजामस्ती करु लागले.
लग्नापूर्वीही शादी प्रीमियर लीग
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनांच्या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी रात्री शादी प्रीमियर लीग पार पडली. या निमित्ताने रात्री मानधना फार्म हाऊस जिथे विवाह सोहळा होणार आहे तिथे स्मृती, पलाशसह महिला खेळाडू, इतर पाहुण्यांनी क्रिकेट सामना खेळण्याचा आनंद घेतला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबीय, महिला खेळाडू आणि दोन्ही कडील मंडळीनी क्रिकेट खेळण्याचा, पाहण्याचा आनंद लुटला. उद्या सायंकाळी स्मृती आणि पलाशचा विवाह सोहळा पार पडणार आहे
भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडतोय धुमधडाक्यात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानधना कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे.आणि लग्नसोहळ्यासाठी नवरदेव असणारे पलाश मूछल हे वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झालेत. मानधना परिवाराकडून त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आले आहे, धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावत आहे, आज हळदीचा कार्यक्रम मोठ्या थाटा माठात पार पडला.