AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता माझी बॅटच बोलेल, बंदीनंतर पुनरागमनावेळी पृथ्वी शॉचा तोरा

'आता माझी बॅटच बोलेल' या आशयाचे हातवारे पृथ्वी शॉने केल्यामुळे त्याला धारेवर धरलं जात आहे.

आता माझी बॅटच बोलेल, बंदीनंतर पुनरागमनावेळी पृथ्वी शॉचा तोरा
| Updated on: Nov 18, 2019 | 11:37 AM
Share

मुंबई : सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध पुनरागमनाच्या सामन्यात अर्धशतक केल्यानंतर बॅट उंचावणारा पृथ्वी शॉ टीकेचा धनी होत आहे. ‘आता माझी बॅटच बोलेल’ या आशयाचे हातवारे पृथ्वीने (Prithvi Shaw Arrogant Gesture) केल्यामुळे त्याला धारेवर धरलं जात आहे.

अर्धशतकाचा आनंद व्यक्त केल्यानंतर पृथ्वी शॉचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ‘बीसीसीआय’ने ट्‌विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वीचे हातवारे त्याची गुर्मी दाखवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

डोपिंग प्रकरणात आठ महिन्यांची बंदी सुनावल्यानंतर 20 वर्षीय पृथ्वी शॉने डोमेस्टिक सामन्यातून पुनरागमन केलं. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून पृथ्वी खेळत होता. त्याने 39 चेंडूंमध्ये 63 धावांची खेळी केली.

‘युवा क्रिकेटपटूंचा तोरा अविश्वसनीय आहे. बंदीनंतर आलेला हो पोरगा अर्धशतक करतो, तेही यथातथा गोलंदाजांसमोर. इतका माज बरा नाही’ असं एका ट्विटर युझरने म्हटलं आहे.

डोपिंग प्रकरणी कारवाई

कफ सिरपमध्ये आढळणारा प्रतिबंधित घटक पृथ्वी शॉने घेतला होता. त्यामुळे तो अँटी-डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या वेळी 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये पृथ्वी शॉने डोपिंग चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. Terbutaline नावाच्या औषधाचं पृथ्वी शॉने सेवन केल्याचं निष्पन्न झालं होतं. हा पदार्थ ‘वाडा’ने बंदी घातलेल्या यादीमध्ये आहे.

डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर पृथ्वी शॉने 16 जुलै रोजी स्पष्टीकरण दिलं होतं. कफ सिरपसाठी हे औषध घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. बीसीसीआयने हे स्पष्टीकरण मान्य केलं. 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी पृथ्वी शॉवर बंदी लागू करण्यात (Prithvi Shaw Arrogant Gesture) आली होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.