ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पृथ्वी शॉ बाहेर, या खेळाडूला संधी

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

पर्थ : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अडचणीत सापडलेली असताना आणखी एक चिंतेची बातमी आहे. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे त्याला पुढील दोन्ही सामन्यात खेळता येणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. शिवाय तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी हार्दिक पंड्याचाही संघात समावेश करण्यात आलाय. ऑस्ट्रेलिया दौरा सुरु […]

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पृथ्वी शॉ बाहेर, या खेळाडूला संधी

पर्थ : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अडचणीत सापडलेली असताना आणखी एक चिंतेची बातमी आहे. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे त्याला पुढील दोन्ही सामन्यात खेळता येणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. शिवाय तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी हार्दिक पंड्याचाही संघात समावेश करण्यात आलाय.

ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्यापूर्वी सरावादरम्यान पृथ्वी शॉला दुखापत झाली होती. त्यानंतर तो तिसऱ्या कसोटीपूर्वी फिट होईल, अशी अपेक्षा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली होती. पण पृथ्वी फिट न झाल्याने त्याला आता उर्वरित दोन सामन्यांनाही मुकावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलामीवीर जोडी केएल राहुल आणि मुरली विजय सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सर्वांनाच पृथ्वी शॉची प्रतीक्षा होती. पण आता या अपेक्षेवर पाणी फेरलं आहे.

मयंक अग्रवालची भारतात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. पण त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दमदार खेळीच्या जोरावर त्याची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.

खरं तर सद्यपरिस्थितीमध्ये भारतीय संघाला पृथ्वी शॉची प्रचंड गरज आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध पृथ्वीने शतकी खेळी करत आंतरराष्ट्रीय पदार्पण साजरं केलं होतं. दोन कसोटीमधील तीन डावांमध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत 118.50 च्या सरासरीने एकूण 237 धावा कुटल्या होत्या. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो सरावातच दुखापतग्रस्त झाला.

आशिया चषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या हार्दिक पंड्याने रणजीमध्ये बडोद्याकडून मुंबईविरुद्ध पहिला सामना खेळला. दुखापतीमुळे तीन महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्या पंड्याने अर्धशतक आणि सात विकेट घेत निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI