AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Ashwin: व्हिडिओ बनवत होता अन् अचानक घरी धडकले पोलिस, अश्विनसोबत नेमकं काय घडलं?

Ravichandran Ashwin Youtube Video Stop: माजी भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतली असून तो त्याचे पूर्ण लक्ष आता त्याच्या युट्यूह चॅनेलवर आहे. तो क्रिकेट संदर्भात अनेक व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता असाच एक व्हिडिओ बनवताना त्याच्या घरी पोलीसांची अचानक धडक घेतली.

R Ashwin: व्हिडिओ बनवत होता अन् अचानक घरी धडकले पोलिस, अश्विनसोबत नेमकं काय घडलं?
| Updated on: Aug 15, 2026 | 9:29 AM
Share

माजी भारतीय ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतली असून तो त्याचे पूर्ण लक्ष आता त्याच्या युट्यूब चॅनेलवर आहे. तो क्रिकेट संदर्भात अनेक व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता असाच एक व्हिडिओ बनवताना त्याच्या घरी पोलीसांनी अचानक धडक घेतली. व्हिडिओ बनवताना तो अचानक उठून गेला. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते समोर आले आहे.

अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी रेकॉर्डिंग करत असतानाच पोलीस आले. अश्विनला त्याचा वॉचमॅन आणि पत्नीने वारंवार फोन केल्यामुळे अश्विनला रेकॉर्डिंग थांबवावे लागले. त्याच्या पत्नीने त्याला पोलिसांच्या एन्ट्रीची माहिती दिली. अश्विनने नंतर या घटनेबद्दल सविस्तर सांगितले की, त्याच्या पासपोर्टशी संबंधित एका सामान्य प्रशासकीय कामासाठी पोलीस त्याच्या घरी आले होते.

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, “माझ्या वॉचमॅनने मला तीन-चार वेळा फोन केला. तो सहसा इतक्या वेळा फोन करत नाही. मग माझ्या पत्नीने मला फोन केला. मी फोन ठेवला आणि विचारले. तिने मला सांगितले, ‘पोलीस दारात आले आहेत.’ मी माझा पासपोर्ट व्हिसासाठी दिला होता. त्यामुळेच ते तो पासपोर्ट परत घेऊन आले होते.”

पोलिसांच्या भेटीचे कारण थेट अश्विनच्या पासपोर्टशी संबंधित होते. त्याने व्हिसा अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून तो दस्तऐवज सादर केला होता आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, एक अधिकारी तो परत करण्यासाठी त्याच्या घरी आले होते. रेकॉर्डिंग दरम्यान अश्विनने स्वतः याची पुष्टी केली. यावरून हे स्पष्ट झाले की, प्रकरण काही गंभीर नसून ते फक्त व्हिसा देण्यासाठी आले होते.

परिस्थिती हाताळण्यासाठी अश्विनने आपले रेकॉर्डिंग थांबवले आणि नंतर घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाचे स्पष्टीकरण देण्यासाठी तो परत आला. आणि त्याने हे सांगितले. अश्विन क्रिकेट संदर्भातील अनेक व्हिडिओ बनवत असतो. अनेक वेळी तो एखाद्या प्रसंगावर स्पष्टपणे विश्लेषणही करतो. विमल हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनाही तो अनेकदा इंटरव्हयू देतो.

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...