AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: भारतविरुद्ध मैदानात उतरणार ‘राजस्थानचा मुलगा’; आयर्लंडच्या संघात एन्ट्री मिळवणारा जय मुंद्रा कोण?

भारतीय संघ दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेसाठी आयर्लंडच्या संघात राजस्थानमध्ये जन्मलेल्या जय मुंद्राचा समावेश आहे.

IND vs IRE: भारतविरुद्ध मैदानात उतरणार 'राजस्थानचा मुलगा'; आयर्लंडच्या संघात एन्ट्री मिळवणारा जय मुंद्रा कोण?
jai moondra
| Updated on: Jun 24, 2026 | 1:53 PM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका लवकरच सुरू होणार आहे. हे दोन्ही संघ 26 आणि 28 जून रोजी बेलफास्टमध्ये आमनेसामने येतील. आयर्लंडने नुकताच आपला संघ जाहीर केला असून, त्यात राजस्थानमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू खेळाडू जय मुंद्राचा समावेश आहे. तो आयर्लंडकडून खेळणारा दुसरा आशियाई क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी पंजाबच्या सिमी सिंगने आयर्लंडकडून पदार्पण केले होते. जय मुंद्राचा जन्म राजस्थानमधील टोंक येथे झाला, जे जयपूरपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि त्याने एका क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. त्याने वेगवान गोलंदाज म्हणून सुरुवात केली आणि नंतर तो अव्वल फळीतील फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज बनला.

2021 मध्ये आयर्लंडला स्थलांतरित क्रिकेट आयर्लंडशी बोलताना त्याने स्पष्ट केले की, “अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने क्रिकेट सोडले होते. कॉलेजमध्ये असताना त्याने पुन्हा वेगवान गोलंदाजी सुरू केली.” 2019 मध्ये, त्याने नोकरी सोडून क्रिकेटला शेवटची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 2021 मध्ये, तो पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी आयर्लंडला गेला, जिथे तो डब्लिनमधील लेन्स्टर क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला आणि आयरिश देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. 2023 मध्ये, आयरिश सिनियर कप जिंकणाऱ्या लेन्स्टर संघाचा तो एक महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आणि आता आयर्लंडच्या टी20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे.

आता या मालिकेत विशेष लक्ष असेल ते वैभव सूर्यवंशीकडे. वैभवला या मालिकेसाठी भारतीय संघात सामील केले आहे. आता तो आयर्लंडविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी आयर्लंडचा संघ: लॉर्कन टकर (कर्णधार), रॉस अडायर, बेन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रीज, गॅविन होए, मॅथ्यू हॉलार्ड, लियाम मॅकार्थी, जय मुंद्रा, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर आणि रुबेन विल्सन.

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत