VIDEO : मराठी दिसणाऱ्या टांझानियाच्या आजीचा टीम इंडियाला सपोर्ट का?

भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यानंतर त्या चक्क हातातली पिपाणी वाजवून 87 वर्षीय आजी टीम इंडियाला सपोर्ट करत होत्या. इतकचं नाही तर त्यांनी गालावर भारताचा झेंडाही रंगवला होता. या वयात त्यांचा हा उत्साह बघितल्यानंतर अनेक कॅमेऱ्यांनी त्यांचे फोटो टिपले.

7 year old Indian fan Charulata Patel indian cricket team, VIDEO : मराठी दिसणाऱ्या टांझानियाच्या आजीचा टीम इंडियाला सपोर्ट का?" width="600" height="395">

CWC 2019 लंडन : विश्वचषकाची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इंग्लंडच्या एजबेस्टन मैदानात काल (2 जुलै) भारत विरुद्ध बांग्लादेश सामना रंगला. हा सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशला हरवत विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलचं तिकीट बूक झालं आहे. टीम इंडियाचा हा सामना बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. तरुणांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत अनेकांनी या सामन्याचा थरार अनुभवला. तरुणांप्रमाणेच हा सामना बघण्यासाठी एका 87 वर्षाच्या एका आजींनी हजेरी लावली. चारुलता पटेल असे या आजीचे नाव असून सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

चारुलता यांना क्रिकेट खूप आवडत असल्याने त्यांनी काल (2 जुलै) च्या सामन्याला हजेरी लावली. त्यांनी वयाची 85 ओलांडली असली, तरी त्यांचा उत्साह दांडगा होता. भारतीय फलंदाजांनी चौकार, षटकार मारल्यानंतर त्या चक्क हातातली पिपाणी वाजवून टीमला सपोर्ट करत होत्या. इतकचं नाही तर त्यांनी गालावर भारताचा झेंडाही रंगवला होता. या वयात त्यांचा हा उत्साह बघितल्यानंतर अनेक कॅमेऱ्यांनी त्यांचे फोटो टिपले. विशेष म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही या आजींची भेट घेतली.

याबाबतचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेट असंख्य चाहत्यांनी त्यांना ‘दादी’ हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे मैदानात लाखो प्रेक्षकांप्रमाणे आजींनीही टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली.

यंदा विश्वचषक भारताने जिंकावा अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली आहे. त्यामुळे भारतच विश्वचषक जिंकणार असा आत्मविश्वासही या आजींनी व्यक्त केला आहे. तसेच माझे आशीर्वाद टीम इंडियाच्या सदैव पाठीशी आहेत, असे चारुलता यांनी एएनआयने दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

एवढंच नाही, तर या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि हिट मॅन रोहित शर्मा यांनीही चारुलता यांची भेट घेतली. तसेच दोघांनीही त्यांच्याशी बोलून त्यांचा आशीर्वाद घेतला. क्रिकेट वर्ल्डकपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या दोघांचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

माझा जन्म टांझानिया या देशात झाला असून त्यांचे आईवडील हे भारतीय आहे. माझे वय 87 वर्षे आहे. माझ्या मुलांना क्रिकेट खेळायला आवडते. त्यामुळे मलाही क्रिकेटची फार आवड आहे. माझा जन्म भारतातील नसला, तरीही माझ्या आईवडीलांचा जन्म भारतातील आहे. म्हणूनच मला माझ्या देशाचा सार्थ अभिमान आहे. गेल्या 20 वर्षापासून मी क्रिकेट बघते आणि क्रिकेटपटूंना मी माझ्या मुलांप्रमाणेच मानते असेही चारुलता आजींना प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

टीम इंडियाने विश्वचषक 2019 च्या बांगलादेशवर 28 धावांनी मात करत सेमीफायनलचं तिकीट बूक केलं आहे. भारताने 13 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान काबिज केलं असून पराभवासोबत बांगलादेशचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलंय. विजयासाठी 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सर्वबाद 286 धावा करता आल्या. मोहम्मद शमीने पहिली विकेट मिळवून दिली, ज्यानंतर हार्दिक पंड्याने तीन फलंदाजांना माघारी धाडून बांगलादेशचं कंबरडं मोडलं आणि चार विकेट घेऊन जसप्रीत बुमराने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत मोलाचं योगदान दिलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *