AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : आधी पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा, आता बॅट्समनला आपल्या फिरकीवर नाचवतो, रवीचा संघर्षमय प्रवास

भारताचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईचा (Ravi Bishnoi) प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. आधी तो पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा आता मात्र बॅट्समनला आपल्या फिरकीवर नाचवतोय.

IPL 2021 : आधी पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा, आता बॅट्समनला आपल्या फिरकीवर नाचवतो, रवीचा संघर्षमय प्रवास
Ravi bishnoi
| Updated on: Apr 03, 2021 | 7:57 AM
Share

मुंबई :  इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल (IPL 2021) ही जगातली अशी एक लीग आहे ज्या लीगने विविध देशांने अनेक बहादुर खेळाडू दिले. या स्पर्धेमुळे खेळाडूंचं टॅलेंट जगाला कळालं. पुढे हेच क्रिकेटर्स आपल्या देशासाठी खेळू लागले. यातील अनेक जणांचा प्रवास खाच-खळग्यांनी भरलेला आहे. भारताचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईचा (Ravi Bishnoi) देखील प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. रवी बिश्नोई हा पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाकडून (Ravi Bishnoi Play For Punjab Kings) खेळतो. (Ravi Bishnoi struggling journey First Work As Labour then Play For Punjab Kings)

आधी पिच बनवण्याकामी रोजगारी करायचा

स्पोर्ट्स यारी या यू ट्यूब चॅनेलशी बोलताना रवी बिश्नोईने आपल्या संघर्षाच्या क्षणांना आठवलं. त्यावेळी त्याने संघर्षाचे पदर उलगडून दाखवले. तो म्हणाला, क्रिकेट खेळण्यासारखी माझी आर्थिक परिस्थिती नव्हती. कोणत्याही क्रिकेट अॅकॅडमीमध्ये जाऊन मी ट्रेनिंग घेईन, हे मला शक्य नव्हतं. एकेकाळी मी पिच बनवण्याकामी मदत करायचो. या काळात मी माझ्या दोस्तांबरोबर, साथीदारांबरोबर सिमेंट आणि विटाही उचलल्या.

राजस्थान रॉयल्सच्या ट्रायलसाठी बोर्डाची परीक्षा सोडली

आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या ट्रायलसाठी मी 12 वी इयत्तेच्या बोर्डाची परीक्षा सोडली होती. या ट्रायलमध्ये मी रिजेक्ट झालो होतो. परंतु मी एका अपयशाने खचून गेलो नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे मी कुठेतरी मी ऐकलं होतं, वाचलं होतं. परंतु ज्यावेळी आपल्याला संधी मिळते, त्यावेळी आपण त्या संधीचं सोनं करायलं हवं, उंच भरारी घ्यायला हवी. आपल्यातलं 100 टक्के आपण द्यायला हवं. त्याचवेळी आपल्याला यश मिळतं, असं रवी म्हणाला.

पाठीमागच्या आयपीएल मोसमात रवीची शानदार कामगिरी

आयपीएलच्या 2020 च्या अगोदर रवीला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने 2 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्या मोसमात त्याने एकूण 14 मॅचेस खेळल्या. ज्यामध्ये त्याने 12 फलंदाजांना माघारी धाडलं. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या पदार्पणाच्या मॅचमध्ये ज्यावेळी मी ओपनिंग पार्टनरशीप तोडली आणि एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट मिळवल्या त्यावेळी संघ सहकाऱ्यांनी माझं खूप कौतुक केलं तसंच कर्णधार के.एल.राहुलने माझ्यावर विश्वास दाखवला. तसंच वेळोवेळी मला अनिल कुंबळे आणि राहुल द्रविडचं मार्गदर्शन मिळतं, असंही रवीने सांगितलं.

(Ravi Bishnoi struggling journey First Work As Labour then Play For Punjab Kings)

हे ही वाचा :

पाकिस्तानच्या बाबर आझमचा ‘वेगवान’ रेकॉर्ड; विराट कोहली, हाशिम आमलाला टाकलं मागे!

Sachin Tendulkar : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची सचिनसाठी प्रार्थना, म्हणाला, ‘सचिन कोरोनालाही सीमेपार पाठवेल”

विराट कोहलीला संताप अनावर, 23 वर्षीय फलंदाजाला भर मैदानात धमकी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.