…आणि म्हणून लोक रवी शास्त्रींच्या विधानावर हसले होते… टीम इंडियाबाबत केला खुलासा

| Updated on: Jan 30, 2022 | 1:14 AM

भारताला परदेशात चांगला खेळ करणारी एक सर्वोत्तम टीम बनविण्याचा प्रयत्न केल्याचे रवी शास्त्री यांनी सांगितले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलवर बोलताना रवी शास्त्री यांनी याबाबत खुलासा केला आहे.

...आणि म्हणून लोक रवी शास्त्रींच्या विधानावर हसले होते... टीम इंडियाबाबत केला खुलासा
रवी शास्त्री, विराट कोहली (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई : भारतीय संघाचे (Indian Cricket Team) माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ते प्रशिक्षक पदावर असताना त्यांनी टीम इंडियावर केलेल्या कामाबाबत एक खुलासा केला आहे. टीम इंडियाला परदेशाच्या खेळपट्टीवर आपला सर्वोत्तम खेळ करणारा संघ बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता. त्यावेळी अनेकांनी यावर शंका घेत त्यांच्या वक्तव्याचा विनोद केला होता. परंतु आगामी काळात खरोखर टीम इंडिया सर्वोच्च टीम म्हणून समोर आली होती. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) युट्यूब चॅनलवर बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी याबाबत खुलासा केला आहे. टीम इंडियाला परदेशात चांगली कामगिरी करणारा सर्वोत्कृष्ट संघ बनवण्यासाठी शास्त्री यांनी विशेषत: खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात सलग मालिका जिंकून चांगली कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्याची किनार

माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या या विधानाला नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची किनार होती. आफ्रिका दौऱ्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या परदेशातील खेळावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरील टीम इंडिया विजयाची प्रमुख दावेदार मानली जात होती. आपल्या आठवणींना उजाळा देताना शास्त्रींनी सांगितले, की त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या होत्या. गेल्यावर्षीही इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया 2-1 ने पुढे होती. परंतु कोरोनामुळे शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. हे यश मिळवण्यापूर्वी भारताला 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेतील मालिकेत टीम इंडिया 2-1 ने हरली होती. इंग्लंडमध्येही 4-1 ने पराभव झाला होता.

फिटनेसवर दिले लक्ष

शास्त्री म्हणाले, टीम इंडिया फिटनेसच्या दृष्टीने अत्यंत मजबूत संघ होता. आपण मुख्य प्रशिक्षक असताना तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि आपण संघाच्या फिटनेसकडे प्रकर्षाने लक्ष दिले होते. खेळपट्टीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया हे ठिकाण अतिशय अवघड आहे. परंतु त्याठिकाणीही आम्ही सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चांगला खेळ केल्यास टीम इंडिया जगाच्या पाठीवर कुठेही आपला सर्वोच्च खेळ दाखवू शकते, असा विश्वासही शास्त्री यांना होता.

इतर बातम्या :

ICC Under-19 World Cup: क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशी वाघांचं झालं मांजर

संजय मांजरेकरांच्या ऑलटाइम ग्रेट कर्णधारांमध्ये कोहलीला स्थान नाही, त्यांनी सांगितलं त्यामागचं कारण…

IPL 2022 आधी हिट है बॉस! धोनीच्या मित्राने 13 चेंडूत कुटल्या 70 धावा, CSK त्याला पुन्हा घेणार?