AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Under-19 World Cup: क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशी वाघांचं झालं मांजर

भारताने आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशच्या संघाला गुडघे टेकायला भाग पाडलं. बांगलादेशचा संपूर्ण संघ 37.1 षटकात 111 धावात ऑलआऊट झाला.

ICC Under-19 World Cup: क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशी वाघांचं झालं मांजर
india vs Bangladesh (Pic Credit ICC)
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 10:23 PM
Share

Under-19 World Cup: अँटिंगा येथे भारत आणि बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) अंडर 19 वर्ल्डकप (under 19 world cup) स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना सुरु आहे. भारताने आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशच्या संघाला गुडघे टेकायला भाग पाडलं. बांगलादेशचा संपूर्ण संघ 37.1 षटकात 111 धावात ऑलआऊट झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार यश धुलचा (Yash dhull) निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन बांगलादेशच्या फलंदाजांना फारकाळ खेळपट्टिवर टिकू दिले नाही. बांगलादेशकडून एसएस मेहरोबने सर्वाधिक (30) धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरी लावून पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताकडून रवी कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सात षटकात 14 धावा देत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

विकी ओस्तवालने आपल्या फिरकीच्या तालावर बांगलादेशी फलंदाजांना नाचवलं. त्याने दोन विकेट घेतल्या. कौशल तांबे, राजवर्धन, आणि अंगक्रिष रघुवंशीने प्रत्येकी एक विकेट घेतला. दोन फलंदाज धावबाद झाले. भारताला तुलनेने सोपे लक्ष्य मिळाले. भारताला मागच्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

रवी कुमारने दिले झटक्यावर झटके बांगलादेशला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण रवी कुमारने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर माहफिजूल इस्लामचा विकेट काढला. त्याला चार चेंडूत फक्त दोन धावा करता आल्या. त्यानंतर रवीने सहाव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इफ्तिखार हुसैनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हुसैनला 17 चेंडूत फक्त एक रन्स करता आला. आठव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्रांतिक नावरोज नाबिलला आऊट करुन बांगलादेशला तिसरा झटका दिला. प्रांतिकने फक्त सात धावा केल्या.

रवीनंतर पुणेकर विकी ओस्तवालने नाचवलं रवीनंतर विकी ओस्तवालने बांगलादेशी फलंदाजांना खेळपट्टिवर टिकू दिलं नाही. त्याने अरिफुल इस्लामला व्यक्तीगत नऊ रन्सवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने मोहम्मद फहीमला खातही उघडू दिलं नाही. कौशल तांबेने बांगलादेशी कर्णधार रकिबुल हसनला तंबूत धाडलं. एच मोलाह 17 धावांवर बाद झाला. एसएम मेहरोबने सर्वाधिक 30 धावा केल्या. त्याला अंगकृष रघुवंशीने आऊट केलं. अशीकुर जमाने 16 धावांचे योगदान दिले. तो धावबाद झाला. राजवर्धनने तनजीम हसन साकिबला आऊट करुन बांगलादेशच्या डावाचा शेवट केला.

india bowled out bangladesh only at 111 in icc under 19 world cup quarter final

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.