IPL 2022 आधी हिट है बॉस! धोनीच्या मित्राने 13 चेंडूत कुटल्या 70 धावा, CSK त्याला पुन्हा घेणार?

फायनलमध्ये धडाकेबाज खेळ दाखवला आहे. त्याने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या फलंदाजीच्या बळावर संघाने 20 षटकात तब्बल 217 धावा कुटल्या.

IPL 2022 आधी हिट है बॉस! धोनीच्या मित्राने 13 चेंडूत कुटल्या 70 धावा, CSK त्याला पुन्हा घेणार?
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भलेही क्रिकेटच्या मैदानापासून दूर असेल, पण सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतो. कधी त्याच्या लूकचे फोटो व्हायरल होतात तर कधी त्याचे पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 2:52 PM

नवी दिल्ली: IPL 2022 मेगा ऑक्शनच्या तयारीसाठी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. मेगा ऑक्शन 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये होणार आहे. मेगा ऑक्शनआधी काय स्ट्रॅटजी असली पाहिजे, ते सर्व ठरवण्यासाठी धोनी चेन्नईमध्ये पोहोचला आहे. कुठल्या खेळाडूला निवडायच, कोणाला नाही हे सर्व ठरवायचं आहे. या दरम्यान न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने (Mitchell Santner) धमाकेदार खेळ दाखवला आहे. सँटनरने न्यूझीलंडच्या देशांतर्गत सुपर स्मॅश लीगच्या (Super Smash league) फायनलमध्ये धडाकेबाज खेळ दाखवला आहे. त्याने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या फलंदाजीच्या बळावर नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघाने 20 षटकात तब्बल 217 धावा कुटल्या. IPL स्पर्धेत मागच्या सीजनपर्यंत मिचेल सँटनर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता.

या सीजनमध्ये सँटनरला चेन्नईने रिटेन केलेले नाही. सँटनरचा सध्याचा फॉर्म पाहता CSK ची थिंक टँक सँटनरला पुन्हा एकदा संघात घेण्याविषयी नक्कीच विचार करेल. धोनीच्या या मित्राने न्यूझीलंडच्या देशांतर्गत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे.

पाचव्या नंबरवर आलेल्या सँटनरची धडाकेबाज खेळी सुपर स्मॅश लीगच्या फायनलमध्ये मिचेल सँटनर नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने 92 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने फक्त 40 चेंडूत 92 धावा तडकावल्या. यात नऊ षटकार आणि चार चौकार होते. म्हणजेच 230 च्या स्ट्राइक रेटने खेळताना सँटनरने फक्त 13 चेंडूत 70 धावा कुटल्या.

सुपर स्मॅश लीगमध्ये सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. याआधी 24 जानेवारीला वेलिंग्टन विरुद्ध खेळताना या डावखुऱ्या फलंदाजाने 59 धावा केल्या होत्या. याच सामन्यात त्याने वेलिंग्टन क्रिकेट स्टेडियममधील म्युझियमची काच फोडली होती.

संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली फक्त आठ धावांनी सँटनरचं शतक हुकलं. तो आऊट झाला म्हणून शतक हुकलं असं नाहीय. षटक संपल्यामुळे सँटनर नाबाद राहिला. त्याच्या 92 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचला. टीमचा सलामीवीर कॅटीन क्लार्कने 71 धावा केल्या. क्लार्कने जी पायाभरणी केली, त्यावर सँटनरने कळस चढवला.

Ms dhoni csk ex player mitchell santner hit 92 runs in super smash final ahead of ipl 2022 mega auction

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.