IPL 2022: लखनऊचा संघ कुठल्या विचाराने मैदानात उतरणार? गौतम गंभीरने सांगितली सुपर जायंट्सची स्ट्रॅटजी

लखनऊ फ्रेंचायजीने कर्णधार म्हणून केएल राहुलची निवड केली आहे. त्याचवेळी मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिष्णोई यांची ड्राफ्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे.

IPL 2022: लखनऊचा संघ कुठल्या विचाराने मैदानात उतरणार? गौतम गंभीरने सांगितली सुपर जायंट्सची स्ट्रॅटजी
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 2:20 PM

नवी दिल्ली: यंदाच्या IPL मध्ये आठ ऐवजी दहा टीम्स असणार आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला आहे. लखनऊ संघाने कर्णधार आणि कोचच्या नावाची घोषणा केली आहे. आयपीएल 2022 साठी पुढच्या महिन्यात Mega auction पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक संघाने काही ना काही रणनिती बनवली आहे. यात लखनऊ सुपर जायंट्स संघही मागे नाहीय. लखनऊ संघाच्या रणनितीमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ते या संघाचे मेंटॉर म्हणजे मुख्य मार्गदर्शकही आहेत. लखनऊ फ्रेंचायजीने कर्णधार म्हणून केएल राहुलची निवड केली आहे. त्याचवेळी मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिष्णोई यांची ड्राफ्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे.

पुढच्या महिन्यात 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठे खेळाडू आहेत. सर्वोत्तम संघ बांधणीसाठी गौतम गंभीर आणि लखनऊ सुपर जायंट्सने आतापासून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. “वारसा तयार करण्याची ही एक चांगली संधी आहे. याआधी जे घडलं नाही, असं काहीतरी निर्माण करु शकतो. आम्हाला कोणाची नक्कल करायची नाही. आम्हाला आमचा स्वत:चा आदर्श निर्माण करायचा आहे”, असे गौतम गंभीरने पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या बॅकस्टेज विथ बोरीया या कार्यक्रमात सांगितले.

त्यावेळी एक रन्सने हुकली संधी 

“संजीव सरांकडे पुण्याची फ्रेंचायजी होती, त्यावेळी अवघ्या एका रन्सने जेतेपद मिळवण्याची संधी हुकली होती. मागच्यावेळी जे शक्य झालं नाही, ते करुन दाखवण्याचं आव्हान आहे. पण हे एकावर्षात घडेल, असं ठामपणे सांगता येणार नाही. ही एक दीर्घकाळाची प्रक्रिया आहे. फक्त यावर्षाचाच आम्ही विचार करतोय, असं नाहीय” असं गंभीर म्हणाला.

रवी बिष्णोईबद्दल म्हणाला…

“गौतम गंभीरने रवी बिष्णोईचं विशेष कौतुक केलं. रवी बिष्णोई तरुण आहे. प्रतिस्पर्धी संघाचे विकेट काढू शकतो. त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळणारच. सामन्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर तो गोलंदाजी करु शकतो. तो अनकॅप्ड खेळाडू आहे. अजून पुढे जाण्यासाठी त्याला तयार करु शकतो” असे गंभीर म्हणाला.

“टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न बघणाऱ्या खेळाडूची लखनऊ सुपर जायंट्सला गरज नाहीय, असं गौतम गंभीरने आधीच स्पष्ट केलय. लखनऊच्या प्लॅटफॉर्मचा वापर करुन टीम इंडियात जागा मिळवण्याचं स्वप्न बघणारे खेळाडू आम्हाला नकोयत. असा विचार म्हणजे फ्रेंचायजीशी बेईमानी असेल. लखनऊसाठी खेळताना चांगली कामगिरी केली, तर तुम्ही टीम इंडियापर्यंत पोहोचू शकता” असे गौतम गंभीर म्हणाला.

Gautam Gambhir Explains Lucknow Super Giants Strategy For IPL 2022 Mega Auction

Non Stop LIVE Update
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.