अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला, टीम इंडियाच्या विजयाचा धडाकेबाज शिल्पकार

Ind vs Eng : भारताने इंग्लंडवर मिळवलेल्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू आर अश्विन (R Ashwin Chennai test) .

अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला, टीम इंडियाच्या विजयाचा धडाकेबाज शिल्पकार
रवीचंद्रन अश्विन
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 1:04 PM

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दणदणीत विजय (Team India win against England Chennai test) मिळवला. चेपॉकच्या मैदानात झालेला हा सामना साडेतीन दिवसातच आटोपला. भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांत गुंडाळून, तब्बल 317 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (India vs England 2nd test Team India win against England Chennai test). भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू आर अश्विन (R Ashwin Chennai test) .

भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 329 धावा केल्या होत्या. मग भारताने इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 134 धावांत गुंडाळून बॅकफूटवर ढकललं. पहिल्या डावात भारताला तब्बल 195 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 286 धावा करुन, इंग्लंडसमोर विजयासाठी 481 धावांचं भलंमोठं आव्हान होतं. मात्र चेपॉकच्या मैदानात भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांत आटोपला आणि भारताने तब्बल 317 धावांनी मोठा विजय मिळवला.

आर अश्विनने पाय रचला, अश्विननेच कळस चढवला

भारताच्या या विजयात सर्वात मोठा वाटा उचलला तो फिरकीपटू ते अष्टपैलू अशी भूमिका बजावणाऱ्या आर अश्विनने. अश्विनने दुसऱ्या डावात आठव्या नंबरवर येऊन खणखणीत शतक ठोकलं. त्याआधी पहिल्या डावात त्याने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला होता. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या डावातही 3 महत्त्वाच्या विकेट घेऊन, भारताच्या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पहिल्या डावात 5 विकेट

इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर गुंडाळण्यात अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉर्डला आऊट करत अश्विनने 5 विकेट्स पूर्ण केल्या. यासह अश्विन कसोटीमध्ये डावखुऱ्या फलंदाजांना 200 वेळा बाद करणारा पहिला फलंदाज ठरला.

आठव्या नंबरवर येऊन शतक

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार शतक लगावलं. अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या. या खेळीसह अश्विनने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अश्विनने धोनीचा 8 व्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक शतक लगावण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला.

आर अश्विनची दुसऱ्या कसोटीतील कामगिरी

पहिला डाव

फलंदाजी – 13 धावा

गोलंदाजी – 23.5 षटकं, 4 मेडन, 43 धावा, 5 विकेट्स

दुसरा डाव

फलंदाजी – 148 चेंडूत 106 धावा, 14 चौकार आणि 1 षटकार

गोलंदाजी – 18 षटकं, 5 मेडन, 53 धावा, 3 विकेट्स

संबंधित बातम्या 

India vs England, 2nd Test | दमदार शतक, शानदार रेकॉर्ड, अश्विनची विक्रमाला गवसणी

रेकॉर्डब्रेक कामगिरीनंतर अश्विन म्हणाला, ‘सॉरी भज्जू पा’, हरभजनकडून मिळालं सॉलिड उत्तर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.