AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England, 2nd Test | दमदार शतक, शानदार रेकॉर्ड, अश्विनची विक्रमाला गवसणी

अश्विनने (R Ashwin) दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 134 चेंडूत धमाकेदार शतक पूर्ण केलं.

India vs England, 2nd Test | दमदार शतक, शानदार रेकॉर्ड, अश्विनची विक्रमाला गवसणी
शतकवीर आर अश्विन
| Updated on: Feb 15, 2021 | 6:14 PM
Share

चेन्नई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)  इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार शतक लगावलं.  अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 फोरच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या. या खेळीसह अश्विनने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला. अश्विनने धोनीचा 8 व्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक शतक लगावण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला. अश्विनने आतापर्यंत तिसऱ्यांदा 8 व्या क्रमांकावर खेळताना शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. तर धोनीने 2 वेळा 8 व्या स्थानावर येत सेंच्युरी केली होती. (india vs england 2021 2nd test day 3 r ashwin makes many record with century)

8 व्या क्रमांकावर सर्वाधिक शतक लगावणारे भारतीय

आर अश्विन – 3

एमएस धोनी – 2

हरभजन सिंह – 2

कपिल देव – 2

तसेच अश्विन 8 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना सर्वाधिक शतक लगावणारा दुसराच फलंदाज आहे. याबाबतीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल व्हिटोरी पहिल्या क्रमांकावर आहे. व्हिटोरीने 8 व्या क्रमांकावर खेळताना 4 वेळा शतक लगावलं आहे.

8 व्या क्रमांकावर सर्वाधिक शतकी खेळी करणारा फलंदाज

डेनियल व्हिटोरी – 4

आर अश्विन – 3

कामरान अकमल – 3

तिसऱ्यांदा 5 विकेट्स आणि शतक

दरम्यान अश्विनने या सामन्यात शतक आणि बोलिंग करताना 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनची अशी कामगिरी करण्याची ही तिसरी वेळ ठरली. अशी अफलातून खेळी करणारा अश्विन दुसराच खेळाडू ठरला आहे. याबाबतीत इयन बॉथम अव्वल क्रमांकावर आहेत. बॉथम यांनी 5 वेळा वेगवेगळ्या सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीत शतक आणि 5 विकेट्स घेणारे खेळाडू

इयान बॉथम – 5

आर अश्विन-3

जॅक कॅलिस-2

मुश्ताक मोहम्मद-2

शाकिब अल हसन-2

गॅरी सोबर्स-2

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test 3rd day | अश्विनची होम पीचवर धमाकेदार शतकी खेळी

India vs England 2nd Test | भर मैदानात बेन स्टोक्सचा अतरंगीपणा, खाली डोकं, वर पाय, हातावरच चालू लागला

अवघ्या 5 तासाच उरकला कसोटी सामना, गोलंदाजाची कमाल, विश्व विक्रमाला गवसणी

(india vs england 2021 2nd test day 3 r ashwin makes many record with century)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.