AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविंद्र जडेजाच्या ‘त्या’ कृत्याने रोहित आणि अजिंक्यच्या तळपायाची आग मस्तकात, नेमकं काय घडलं?

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे अष्टपैलू सर रविंद्र जडेजावर चांगलेच संतापले होते. जंगलात कोणी असं करत का? असं सांगत रोहित शर्माने आपला राग व्यक्त केला होता. वाचा नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी

रविंद्र जडेजाच्या 'त्या' कृत्याने रोहित आणि अजिंक्यच्या तळपायाची आग मस्तकात, नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे अष्टपैलू सर रविंद्र जडेजावर चांगलेच संतापले होते. जंगलात कोणी असं करत का? असं सांगत रोहित शर्माने आपला राग व्यक्त केला होता.
| Updated on: Feb 04, 2023 | 6:25 PM
Share

मुंबई: कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ही तीनही नावं भारतीय क्रिकेटप्रेमींना सर्वश्रूत आहे. आतापर्यंत या तिघांनी मैदानात आपल्या कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अनेकदा विरोधी संघाच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर हे तिघं एकमेकांचे चांगले मित्र असून तिघांचे कौटुंबिक संबंध आहेत. अनेकदा तिन्ही कुटुंब एकत्र फिरण्यासाठी गेले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेतील जंगल सफारी तिन्ही कुटुंबाच्या कायम स्मरणात राहणारी आहे. एका मुलाखतीत अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा याने खुलासा केला आहे. जंगलात रविंद्र जडेजाने केलेल्या कृतीने रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. मात्र चित्त्यांच्या भीतीपोटी काहीच करू शकला. त्या दिवसापासून रविंद्र जडेजासोबत कुठेही फिरण्यास जाऊ नये, असा सल्ला रोहित शर्माने दिला आहे. इतकंच काय तर संयमी असलेल्या अजिंक्य रहाणे यानेही त्याला दुजोरा दिला.

नेमकं काय घडलं होतं वाचा

  • अजिंक्य रहाणे- दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आम्ही चित्ते पाहण्यासाठी गेलो होतो. आम्हाला वाटलं की दोन तीन चित्ते वॉक करताना दिसतील. आम्ही त्यांच्या पाठिमागे जाऊ. पण आम्ही जंगलात होतो. आजूबाजूला नेमकं काय होतं आम्हाला माहिती नव्हतं. तिथे दोन चित्त्यांनी 20 ते 25 मीटरच्या क्षेत्रात शिकार केली होती. मी, रोहित, राधिका, रितीका, जडेजा आम्ही तिथे पोहोचलो.
  • रोहित शर्मा- रविंद्र जडेजासोबत कधीही कुठेही जाऊ नये. खऱ्या अर्थाने तो वेडा आहे.
  • अजिंक्य रहाणे- आम्ही सर्व एकत्र होतो. तिथे चित्त्यांनी आम्हाला वळून पाहिलं.
  • रोहित शर्मा- कारण फक्त जडेजा होता. शूकssशूकss करून त्यांना आवाज देत होता. तेव्हा मी बोललो, अरे हे काय करतो आपण जंगलात आहोत. त्यांना कळलं तर आपलं काही खरं नाही. आमच्या आयुष्यातला सर्वात वाईट अनुभव होतो तो. दोन चित्त्यांनी शिकार केली होती आणि ते खात होते. तेव्हा त्यांना त्रास द्यायचा नसतो. मात्र नेमकं तेव्हा जडेजानं आवाज करणं सुरु केलं. त्याच्याबरोबर तिथे जाणं आम्हाला चांगलंच महागात पडलं होतं. त्याला गाडीतच सोडायला हवं होतं.
  • अजिंक्य रहाणे- त्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं. आम्ही शूर आहोत. पण जेव्हा आम्हाला गाईडनं सांगितलं की, चित्ता तुमच्या धावत आला तर पळायचं नाही. तुम्हाला जागेवरच उभं राहायचं आहे.
  • रोहित शर्मा- तेव्हा आम्हाला कळलं की त्याने हल्ला केला तरी आम्हाला पळायचं नाही. आमच्या दोघांच्या बायका मर्दानीसारख्या उभ्या होत्या. मी सर्वात जास्त घाबरलो होतो. जसा जडेजाने आवाज केला. तेव्हा चित्त्यांनी मागे वळून पाहिलं. तेव्हा नेमकं मलाच माहिती होतं की मला काय वाटतं ते. तेव्हा मी जडेजाला रागाने बघत होतो. पंच करण्याचं मन करत होतं. पण शांत राहणं गरजेचं होतं. कारण चित्त्यांना त्रास दिला असता तर त्याने हल्ला केला असता. म्हणून जडेजासोबत कुठेही जाऊ नये.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याासाठी महत्त्वाची आहे. ही मालिका भारताला 3-0 ने जिंकायची आहे. या संघात अजिंक्य रहाणे नसला तरी अष्टपैलू रविंद्र जडेजाचं पुनरागमन झालं आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.