सारा सोडा! शुभमनच्या मागे आता कोण पडलंय माहिती आहे का? उमेश यादवनं स्पष्टच सांगितलं…

भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून सध्या शुभमन गिलकडे पाहीलं जात आहे. असं असताना 23 वर्षीय शुभमन गिल वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी चर्चा रंगलीय ती नागपूरमध्या लागलेल्या होर्डिंगची..

सारा सोडा! शुभमनच्या मागे आता कोण पडलंय माहिती आहे का? उमेश यादवनं स्पष्टच सांगितलं...
नागपूरमध्ये रंगलीय पोस्टर गर्लची चर्चा, उमेश यादवनं शुभमन गिलची घेतली फिरकी
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 3:52 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील बॅटर शुभमन गिलची चर्चा रंगली आहे. 23 वर्षीय शुभमन चांगलाच फॉर्मात आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी केली असून शतक झळकावलं आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून शुभमनचं नाव ‘सारा’सोबत जोडलं जात आहे. सारा तेंडुलकर की, सारा अली खान याबाबत सोशल मीडियावर त्याला प्रश्न विचारले जात आहेत. मात्र याबाबत शुभमनने कधीच कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. इतकंच काय मैदानावर क्षेत्ररक्षण करताना देखील शुभमनला ‘सारा..सारा..’ नावाने चिडवलं जातं. प्रेक्षकांचा हा जयघोष ऐकून भर मैदानात विराट कोहलीलाही हसू आवरलं नव्हतं. आता त्यात आणखी एका मुलीची भर पडली आहे. काय तुमचा विश्वास बसत नाही, पण तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. याबाबतचा खुलासा खुद्द क्रिकेटपटू आणि गोलंदाज उमेश यादव याने केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना रंगणार आहे. मात्र सामन्यापूर्वी नागपूर शहरभर लागलेले पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर भारत-न्यूझीलँड टी-20 सामना पाहण्यासाठी आलेल्या तरुणीचा फोटो आहे. या सामन्यादरम्यान तरुणीच्या हातात असलेल्या पोस्टरने लक्ष वेधून घेतलं होतं. त्या पोस्टरवर ‘टिंडर शुभमनसे मॅच करा दो!’, असं लिहिलं होतं.

आता हेच पोस्टर नागपूरच्या चौकाचौकात लागले आहेत. या पोस्टरचे फोटोन उमेशने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर पोस्टर पाहून क्रिकेटर आणि नागपूरकर उमेश यादव याने शुभमनला मोलाचा सल्ला दिला आहे. “पूरा नागपूर बोल राहा है, शुभमन गिल अब तो देख लो”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका आहे. टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. भारता ही मालिका 3-0 जिंकणं आवश्यक आहे. या मालिकेतील निकालावरच अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 75.56 टक्के गुणांसह अव्वल स्थानी, 58.93 टक्के गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी, 53.33 गुणांसह श्रीलंका तिसऱ्या स्थानी, 48.72 गुणांसह दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानी आहे. भारताने ही मालिका गमवल्यास श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे.

23 वर्षीय शुभमन गिलचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी पंजाबमधील फजिल्का येथे झाला. शुभमने आतापर्यंत 13 कसोटीत 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 736 धावा केल्या आहेत. 21 एकदिवसीय सामन्यात 4 शतकं आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 1254 धावा केल्या आहेत. यात द्विशतकी खेळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच 6 टी 20 सामन्यात 1 शतकासह 202 धावा केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.