AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल द्रविडच्या शिष्यासाठी विराट कोहलीचे आवडते गोलंदाज संघाबाहेर; ऋषभ पंतचा धक्कादायक निर्णय

पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.

राहुल द्रविडच्या शिष्यासाठी विराट कोहलीचे आवडते गोलंदाज संघाबाहेर; ऋषभ पंतचा धक्कादायक निर्णय
virat-kohl
| Updated on: Apr 10, 2021 | 11:45 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु खेळवण्यात आला. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये खेळवला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. दरम्यान, या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने आज टॉस जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होतं. या सामन्यात ऋषभ पंतने संघाची निवड करताना आपलं कौशल्य दाखवलं. (Rishabh Pant not pick Umesh Yadav and Ishant Sharma in Delhi Capitals Playing Eleven for Avesh Khan)

आजचा सामना भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी विरुद्ध विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्यात खेळवण्यात आला. पंतकडे धोनीचा क्रिकेटमधला वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. त्यात आज त्याचा कर्णधार म्हणून धोनीशी मुकाबला होता. कर्णधार म्हणून चाहत्यांचं धोनी आणि पंत या दोघांच्या डावपेचांवर लक्ष होतं. कर्णधाराच्या भूमिकेत पंतचा दृष्टिकोन कसा असणार याची पहिली झलक केवळ त्याने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनवरुन पाहायला मिळाली. कारण पंतने प्लेईंग इलेव्हन निवडताना धक्कादायक निर्णय घेतला. पंतने दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडच्या एका शिष्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या दोन खास वेगवान गोलंदाजांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नाही.

ऋषभ पंतने जेव्हा प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली तेव्हा वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि इशांत शर्मा या दोघांचीही नावं त्यात नव्हती. पंतने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध ज्या गोलंदाजांवर विश्वाच दाखवला, त्यात ख्रिस वोक्स, आवेश खान, टॉम करन, अमित मिश्रा, रवीचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून मार्कर्स स्टॉयनिस यांचा समावेश केला. यामध्ये पंतने भारतीय संघातील जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आणि उमेश यादव ऐवजी राहुल द्रविडचा शिष्य असलेल्या मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खानला प्राधान्य दिलं. पंतचा हा निर्णय सुरुवातीला अनेकांना धक्कादायक वाटला होता. परंतु आवेश खानने त्याच्या गोलंदाजीद्वारे त्याच्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

राहुल द्रविडचा शिष्य

19 वर्षाखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक असताना राहुल द्रविडने आवेश खानची संघात निवड केली होती. स्वतः आवेशनेही असं म्हटलं आहे की, माझं भाग्य आहे की, मला राहुल सर प्रशिक्षक म्हणून मिळाले. त्यांच्यासोबतची भेट खूप खास होती. इथून पुढच्या काळात खूप परिश्रम घ्यावे लागतील, ही बाब राहुल सरांनी खूप सहजतेने सांगितली होती. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आवेश खानने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. यात त्याने 6 फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला आहे. या दरम्यान, त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 29 धावांत दोन बळी घेण्याची होती. अवेश खानचा इकॉनॉमी रेट थोडा महाग होता. त्याने 9.68 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. 2018 च्या हंगामात त्याला 6 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या 6 सामन्यांमध्ये त्याने 4 बळी घेतले होते.

संबंधित बातम्या

CSK vs DC Live Score, IPL 2021 | पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात

CSK vs DC, IPL 2021 | मराठमोळ्या अजिंक्य रहाणे आणि अमित मिश्राचा अनोखा कारनामा

Suresh Raina, CSK vs DC 2021 | ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे अर्धशतक, आयपीएलच्या 14 व्या मोसमाची शानदार सुरुवात

(Rishabh Pant not pick Umesh Yadav and Ishant Sharma in Delhi Capitals Playing Eleven for Avesh Khan)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.