AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

video : डीआरएस रिव्ह्यूबाबत रोहित शर्मानं विकेटकीपर श्रीकर भारतला स्पष्टच सांगितलं, “जर चुकून…”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना अवघ्या काही तासात सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी तिसऱ्या कसोटीतील विजय महत्त्वाचा असणार आहे.

video : डीआरएस रिव्ह्यूबाबत रोहित शर्मानं विकेटकीपर श्रीकर भारतला स्पष्टच सांगितलं, जर चुकून...
रोहित शर्मा विकेटकीपर श्रीकर भारतला डिआरएस रिव्ह्यूबाबत काय म्हणाला? Watch VideoImage Credit source: PTI
| Updated on: Feb 28, 2023 | 8:20 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना सुरु होण्यासाठी अवघ्या तासांचा अवधी शिल्लक आहे.या मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतल्याने ऑस्ट्रेलियावर सहाजिकच दबाव असणार आहे. तिसऱ्या सामन्यात कमबॅक करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जोरदार रणनिती करत आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ रणनितीनुसार ऑस्ट्रेलियाला खिंडीत पकडण्यास सज्ज आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत भारताचा विकेटकीपर श्रीकर भारत याने खुलासा केला आहे. डिआर रिव्ह्यूमध्ये विकेटकीपरची भूमिका मोलाची असते. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं हे करून दाखवलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे एकही विकेट हातून सुटू नये यासाठी रोहित शर्मानं त्याला कानमंत्र दिला आहे. रोहित शर्मानं नेमकं काय सांगितलं याबाबत श्रीकर भारतनं सांगितलं आहे.

“रोहित शर्मा माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, तू चांगल्या प्रकारे जज करतो. तसंच बॅट्समनच्या खूप जवळ उभा असतो. तेव्हा जे काही वाटेल ते मला निसंकोच सांग. तू, मी आणि गोलंदाज यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. जर चुकून आउट नाही झाला, तर चिंता करू नको. त्या क्षणाला तू काय फील केलं तो निर्णय सांग. जराही घाबरू नको.”, असं श्रीकर भारतनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

तिसऱ्या कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यात श्रीकर भारत चांगलाच घाम गाळला. प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली त्याने विकेटकीपिंगचा सराव केला. श्रीकर भारत पहिल्या कसोटी सामन्यातील एका डावात 10 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. टोड मर्फीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन तंबूत परतला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात श्रीकर भारत 12 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. नाथन लियॉनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने त्याचा झेल घेतला.तर दुसऱ्या डावात 22 चेंडूत 23 धावा करून नाबाद राहिला.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मैथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.