AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma and Hardik Pandya: रोहित शर्मा – हार्दिक पंड्यामधील वाद कसा मिटला ? राहुल द्रविड यांची महत्वाची भूमिका, कोहलीनेही..

देशातील नामवंत क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. मात्र अखेर त्यांच्यातील वाद मिटले, त्यामध्ये कोच राहुल द्रविड आणि विराट कोहली यांची प्रमुख भूमिका होती.

Rohit Sharma and Hardik Pandya: रोहित शर्मा - हार्दिक पंड्यामधील वाद कसा मिटला  ? राहुल द्रविड यांची महत्वाची भूमिका, कोहलीनेही..
Image Credit source: social media
| Updated on: Aug 30, 2024 | 2:03 PM
Share

आयपीएल 2024 दरम्यान मुंबई इंडियन्स संघातील दोन खेळाडूंच्या आपापसांतील मतभेदांमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली होती. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून निवड केल्यानंतर या वादाच्या बातम्यांना तोंड फुटलं. त्यांच्यात वाद सुरू झाले. आणि या निर्णयमुळे संघातील खेळाडूही खुश नव्हते अशी चर्चा होती. जिथे जाईल तिथे हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक-रोहितने मारलेली मिठी पाहू न सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यांच्यातील वाद हा अखेर कसा मटिला, याबद्दलही चर्चा सुरू झाल्या.

हार्दिक आणि रोहितमधील वाद मिटवण्यामध्ये राहुल द्रविड यांची प्रमुख भूमिका होती अशी माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांनी कोहलीलाही हाताशी धरल्याचं समजतं. द्रविड यांनी एकच गोष्ट केली.

द्रविड यांनी काय केलं ?

आयपीएलनंतर लगेच आयसीसी टी-20 विश्वचषकाची स्पर्धा होती आणि यावेळी रोहित शर्माकडे टीम इंडियाची धूरा होती. त्यामुळे रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेद दूर होतील की नाही?, असे प्रश्न उपस्थित होत होते. पण एका रिपोर्टनुसार, कोच राहुल द्रविड आणि कोहली यांनी हार्दिक-रोहितला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

असा मिटला वाद

आयपीएलनंतर भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 अमेरिकेत दाखल झाला आणि सराव सुरू केला. पहिल्या दिवशी रोहित आणि हार्दिक एकमेकांशी बोलले देखील नाहीत. पण दुसऱ्या दिवशी रोहित आणि हार्दिक एका कोपऱ्यात एकत्र बसून बोलतांना दिसले. बराच वेळ त्यांचा संवाद चालू होता. त्यानंतर दोघांनी एकत्र सराव केला. रोहित शर्माने त्याच्या सहकाऱ्याची फलंदाजी आणि गोलंदाजीदेखील तपासली.

एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला एकत्र आणण्यात राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनीही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. द्रविडने रोहित शर्मा आणि हार्दिक या दोघांना एकत्र बोलावलं. आपली भूमिका समजावून सांगतानाचा त्या दोघांचं संघातील स्थान काय आहे हेही समजावलं. जबाबदारी समजावत सर्व गोष्टी स्पष्टपणे  सांगितल्या. ही बैठक महत्वाची ठरली. त्यावेळी विराट कोहली देखील उपस्थित होता.

अखेर टी 20 वर्ल्डकपमध्ये संपूर्ण भारतीय संघ एकजूट होऊन खेळताना दिसला. आणि फायनलमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने टी 20 वर्ल्डकपवर नावही कोरलं. त्या विजयानंतर रोहित-हार्दिकने मारलेली मिठी, तो क्षण आजही सर्वांच्या लक्षात आहे.

रोहित पडणार बाहेर ?

दरम्यान, आयपीएल 2025 च्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडून लखनौच्या संघात सामील होऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मेगा ऑक्शन दरम्यान लखनौ सुपर जायंट्सकडून रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपयांची बोली लावणार असल्याची देखील चर्चा आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.