ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला संघातून वगळले ; दुखापत गंभीर, आयपीएलमधूनही माघार घेणार?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने रोहित शर्माला वगळल्यामुळे त्याची ही दुखापत गंभीर असल्याची शक्यता बळावली आहे. | Rohit Sharma

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला संघातून वगळले ; दुखापत गंभीर, आयपीएलमधूनही माघार घेणार?

नवी दिल्ली: भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या तिन्ही संघातून वगळण्यात आले आहे. विराट कोहली टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, यापैकी एकाही संघात रोहित शर्माचा समावेश न झाल्याने वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. (Rohit Sharma not selected in Team India squad for Australia tour)

रोहित शर्मा सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे रोहित शर्मा लागोपाठ दोन सामन्यांमध्ये खेळलेला नाही. अशातच आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने रोहित शर्माला वगळल्यामुळे त्याची ही दुखापत गंभीर असल्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आयपीएलच्या उर्वरित मोसमातूनही माघार घेईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याचा मोठा फटका मुंबई इंडियन्स संघाला बसू शकतो. मात्र, याबद्दल अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


तर दुसरीकडेनिवड समितीच्या प्रोटॉकॉलमुळे रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही, असे सध्या सांगण्यात येतेय. रोहित शर्मा सध्या दुखापतग्रस्त आहे. खेळाडू दुखापतग्रस्त असताना संघनिवड करण्यात आल्यास संबंधित खेळाडुचा त्या दौऱ्यासाठी विचार केला जात नाही, असा नियम आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबपासून होणार आहे. एवढ्या वेळेत रोहित शर्मा तंदरुस्त होऊ शकत नाही का, असा सवाल निर्माण झाला आहे. याचा अर्थ रोहित शर्मा याची सध्याची दुखापत गंभीर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकेश राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत असलेला लोकेश राहुलला वनडे आणि टी 20 सीरिजसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

(Rohit Sharma not selected in Team India squad for Australia tour)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI