रोहित शर्मा सलामीला, द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

रोहित शर्माला सलामीसाठी संधी द्यायची असल्याचं बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे युवा फलंदाज शुबमन गिललाही (Shubman Gill) संधी (indian team for south africa tour 2019) देण्यात आली आहे.

रोहित शर्मा सलामीला, द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा (indian team for south africa tour 2019) करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसलेला केएल राहुलला यावेळी संघातून वगळण्यात आलंय. रोहित शर्माला सलामीसाठी संधी द्यायची असल्याचं बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे युवा फलंदाज शुबमन गिललाही (Shubman Gill) संधी (indian team for south africa tour 2019) देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणमच्या मैदानात पहिल्या कसोटीला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यात तीन टी-20 आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. टी-20 मालिकेची सुरुवात 15 सप्टेंबरला धर्माशालेच्या मैदानातून होईल.

कसोटीसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा आणि शुबमन गिल

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

  • पहिला टी-20 सामना – 15 सप्टेंबर, धर्मशाला
  • दुसरा टी-20 सामना – 18 सप्टेंबर, मोहाली
  • तिसरा टी-20 सामना – 22 सप्टेंबर, बंगळुरु
  • पहिला कसोटी सामना – 2 ऑक्टोबर, विशाखापट्टणम
  • दुसरा कसोटी सामना – 10 ऑक्टोबर, रांची
  • तिसरा कसोटी सामना – 19 ऑक्टोबर, पुणे
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *