AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरसह ‘या’ 3 दिग्गजांना ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान

आयसीसीने (ICC) भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये (ICC Cricket Hall of Fame) समावेश करुन सन्मान केला आहे.

सचिन तेंडुलकरसह 'या' 3 दिग्गजांना ‘ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान
| Updated on: Jul 19, 2019 | 3:08 PM
Share

लंडन: आयसीसीने (ICC) भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये (ICC Cricket Hall of Fame) समावेश करुन सन्मान केला आहे. सचिनसोबत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड (Allan Donald) आणि ऑस्ट्रेलियाची दोनदा विश्वचषक विजेता महिला क्रिकेटर कॅथरीन फिट्जपॅट्रिक (Cathryn Fitzpatrick) यांचाही क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश आहे.

लंडनमधील मॅडम तुसाद म्युझियममध्ये आयोजित सन्मान कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याचे म्हटले. 46 वर्षांच्या सचिनची तुलना अनेकदा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याशी केली जाते. सचिन एकदिवसीय आणि कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचाही विक्रम आहे. सचिनने एकूण 34,357 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तसेत तो 100 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकणारा एमकेव खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकेचे 52 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज डोनाल्ड यांनी 2003 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी 330 कसोटी आणि 272 एकदिवसीय विकेट घेतल्या आहेत. कॅथरीन फिट्जपॅट्रिक या महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या दुसऱ्या महिला गोलंदाज आहेत. त्याच्या नावावर 181 एकदिवसीय आणि 60 कसोटी विकेट आहेत. प्रशिक्षण म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला 3 वेळा विश्वचषक मिळवून दिला.

सचिनच्या आधी हा सन्मान मिळालेले भारतीय खेळाडू 

  • राहुल द्रविड
  • बिशन सिंह बेदी
  • कपिल देव
  • सुनील गावस्कर
  • अनिल कुंबळे

‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ काय आहे?

‘आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम’ एक असा समुह आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मानित करणे हा याचा उद्देश आहे. आयसीसीने ‘फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन’च्या मदतीने हा पुरस्कार सुरु केला होता. सुरुवातीला या यादीत 55 खेळाडूंचा सहभाग होता. या सुरुवातीच्या यादीत सर डॉन ब्रॅडमन, एलन बॉर्डर आणि इमरान खान यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.

अन्य देशांच्या तुलनेत हॉल ऑफ फेममध्ये ब्रिटीश खेळाडूंची संख्या अधिक आहे. त्यानंतर दरवर्षी या समुहात नव्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश केला जातो. मागील वर्षी भारताचा माजी क्रिकेटर ‘द वॉल’ राहुल द्रविड, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटर क्लारा टेलरचा समावेश करण्यात आला होता.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.