Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

| Updated on: Jan 19, 2021 | 1:52 PM

ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. | Sachin Tendulkar

Aus vs Ind 4th Test:  ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर गॉड ऑफ क्रिकेट म्हणाला....
Follow us on

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे खेळायचे याच्या कक्षा आपण आणखी रुंदावल्या. आपण दुखापत आणि अनिश्चिततेला संयम आणि आत्मविश्वासाने प्रत्युत्तर दिले. हा विजय ऐतिहासिक आहे, असे सचिन तेंडुलकर याने ट्विट करुन म्हटले. (Sachin Tendulkar tweet after India win Brisbane Test)

या विजयामुळे टीम इंडिया आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

ब्रिस्बेन कसोटीतील विजयासह भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर धूळ चारण्याचा हा पराक्रम अनेक अर्थांनी विशेष ठरला आहे.

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा हा सामना अनिर्णीत राहील, असा अनेकांचा होरा होता. मात्र, शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (56) भारताच्या विजयाचा पाया रचायला सुरुवात केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य राहणे झटपट 24 धावा केल्या. राहणे माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेवून ठेवले. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

(Sachin Tendulkar tweet after India win Brisbane Test)